बहिणीच्या लग्नासाठी पै पै कमावले अन् ट्रेनमधून पडला, 28 वर्षीय तरूणाच्या कुटुंबावर काळाचा घाला

Mumbai Railway Accident :  मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात 9 प्रवासी हे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं मुंबईसह ठाण्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दोन लोकल ट्रेन एकमेकांजवळ आल्याने 9 जून रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी ही दुर्देवी घटना घडली.

mumbai railway accident he earned money for his sister's wedding and died after falling from a train

mumbai railway accident he earned money for his sister's wedding and died after falling from a train

मुंबई तक

09 Jun 2025 (अपडेटेड: 09 Jun 2025, 11:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू

point

ट्रेन एकमेकांजवळ आल्याने प्रवाशांच्या  बॅगा आदळल्याची दुर्देवी घटना

Mumbai Railway Accident : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात 9 प्रवासी हे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं मुंबईसह ठाण्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दोन लोकल ट्रेन एकमेकांजवळ आल्याने 9 जून रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी ही दुर्देवी घटना घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान ही घटना घडल्याचे कारण आता समोर आले आहे. प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना आदळल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : ढाब्यावर पोलिसांनी आवळल्या सोनमच्या मुसक्या! पती राजाची हत्या का केली? समोर आली मोठी अपडेट

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनं पुन्हा एकदा मुंबईच्या गर्दीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. चाकरमानी पोटापाण्यासाठी तास दोन तासाचा प्रवास करतात. या घटनेत अनेक लोकांचे आई, बाबा, भाऊ, बहीण अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. अशातच मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी एका गरी कुटुंबातील एकुलता एक कमावत्या मुलाचा अंत झाला आहे. त्याचं नाव राहुल असे असून त्याने पै पै साठवून आपल्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतली होती. मात्र, बहिणीच्या हाताला मेंहंदी लागण्यापूर्वीच त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात गुप्ता कुटुंब हे वाऱ्यावर उघडं पडलं आहे.  

राहुलच्या मृत्यूची बातमी समजताच घटनास्थळी पोहोचलेल्या त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रांना अश्रू अनावर झाले. राहुल गुप्ता हा दररोज मुंब्राहून मुंबईला नोकरीसाठी प्रवास करायचा. तो एका स्टेशनरी दुकानात कामासाठी जात होता. याचदरम्यान राहुलचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुलला आपल्या बहिणीचे लग्न करायचे होते. घरी एकुलता एक कमावत्या मुलाच्या मृत्यूने त्यांना आर्थिच चणचण निर्माण होण्याची शक्यता आहे. 

यामुळे आता काही मित्रांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राहुलच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. राहुलच्या घरी आई-वडील दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ असं त्यांचं कुटुंब आहे. दरम्यान, याच अपघातादरम्यान एका रेल्वे पोलिसाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : लोणावळ्यात तरुणांनी भुशी डॅमचं कुंपण ओलांडलं, धपा धप मारल्या उड्या अन् नंतर गटांगळ्या खात...

रेल्वे अपघातात मृत्यू रेल्वे पोलिसाचा

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी एका रेल्वे पोलिसाचाही समावेश आहे. विकी मुख्यदल असे मृत रेल्वे पोलिसाचे नाव असून ते 2024 पासून ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यापूर्वी कल्याण पोलीस ठाणे येथे कार्यरत असून ते कल्याण येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रपाळीची शिफ्ट करुन ते घरी जाताना ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती विकीच्या मावशीने दिली आहे.