नागपूर : भाचा बेडरुममध्ये शिरला अन् मामीसोबत केले नको तेच, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Nagpur Crime News : नागपूरमधील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 32  वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 30 वर्षीय सख्ख्या भाच्यावर अश्लील कृत्य आणि विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद अल्तमश सलीम शेख याला बेड्या ठोकल्या असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime News

Nagpur Crime News

योगेश पांडे

• 11:17 AM • 26 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : भाचा बेडरुममध्ये शिरला अन् मामीसोबत केले नको तेच

point

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Nagpur Crime News : नागपूरमधील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 32  वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 30 वर्षीय सख्ख्या भाच्यावर अश्लील कृत्य आणि विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद अल्तमश सलीम शेख याला बेड्या ठोकल्या असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पतीला मुलगाच हवा होता... रागाच्या भरात दोन महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या!

बेडरुममध्ये शिरून अश्लील चाळे

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 15 फेब्रुवारी रोजी दुपारी आपल्या घराच्या बेडरुममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. यावेळी तिचा भाचा मोहम्मद अल्तमश तिथेच बेडवर झोपलेला होता. महिला कपडे घेऊन खोलीबाहेर पडत असताना आरोपीने मागून तिला पकडण्याचा प्रयत्न केला. महिलेने तात्काळ प्रतिकार करत त्याला जाब विचारला असता, काहीही न बोलता आरोपी तिथून निघून गेला. मात्र, त्याच्या मनात सुरू असलेल्या विकृत विचारांची कुणकुण महिलेला लागली होती.

महिला घरी एकटी असताना काय घडलं?

पहिली घटना घडून काही दिवस उलटल्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सकाळी जेव्हा महिला घरात एकटी होती, तेव्हा आरोपी पुन्हा तिथे पोहोचला. त्याने पुन्हा बेडरुममध्ये जाऊन महिलेला मागून मिठी मारली आणि अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी मात्र पीडितेने हिंमत न हारता त्याला जोरात धक्का दिला आणि स्वतःची सुटका करून घराबाहेर धाव घेतली. या घटनेमुळे पीडित महिला प्रचंड मानसिक धक्क्याखाली होती.

हे ही वाचा : नवरा परदेशात अन् इकडे बायकोचं कांड, 22 दिवसांच्या नवजात मुलीचा घोटला गळा; सासऱ्याने केला गंभीर आरोप

पोलीस कारवाई आणि अटक

घडल्या प्रकारानंतर पीडितेने धीर एकवटून यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी मोहम्मद अल्तमश सलीम शेख याच्याविरुद्ध विनयभंग आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रक्ताच्या नात्यातील या घृणास्पद कृत्यामुळे समाजात संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

    follow whatsapp