नागपूर आरटीओ अधिकाऱ्याने युनिफॉर्म परिधान न करताच ड्युटी केली, बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप

Nagpur News : नागपूर शहरातील एका अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओमधील एक अधिकारी आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉड MH LT 6631 या गाडीत नोकरीदरम्यान आरटीओचा गणवेश न परिधान करताच बसलेला दिसून येत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती आपण ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगत व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसते. 

Nagpur News

Nagpur News

योगेश पांडे

20 Feb 2026 (अपडेटेड: 20 Feb 2026, 04:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर शहरातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

point

संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ समोर

Nagpur News : नागपूर शहरातील एका आरटीओ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. व्हिडिओमधील एक अधिकारी आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉड MH 04 - LT-6631 या गाडीत नोकरीदरम्यान आरटीओचा गणवेश परिधान न करताच बसलेला दिसून येत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती आपण ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगत व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : '..यासाठी मी त्यांना परत भेटीन' एकनाथ शिंदेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

आरटीओ निरीक्षकावर गणवेश परिधान न करताच बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप 

दरम्यान हा व्हिडिओ शुक्रवारी सायंकाळी कळमना परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोक आरटीओ अधिकाऱ्याला घेरतात आणि आरटीओ निरीक्षकावर गणवेश परिधान न करताच बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप करत आहेत. 

संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ समोर

संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागपूर शहर आरटीओने व्हिडिओबाबत स्पष्टीकरण जारी केले, ज्यात म्हटले की, कर्मचारी नियमित कामकाज करत होते. ज्या व्यक्तीवर खटला चालवला जात आहे, त्याने व्हिडिओमध्ये निराधार वक्तव्ये केली आहेत आणि या संदर्भात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : मुंबईतील सांताक्रूझमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, भीषण आग लागून चाळ हादरली, गॅस मेकॅनिकसह इतर जखमी

आज तक माध्यमाशी आरटीओचे अधिकारी मंगेश राठोड बोलले की, ते त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. एका व्यक्तीने चालान प्रक्रियेदरम्यान त्यांचे चित्रिकरण केले आणि व्हिडिओ व्हायरल केला. 

    follow whatsapp