Nalasopara Crime : वसईतील नालासोपाऱ्यात रविवारी (दि.2) मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेत दीपक जोगडिया (35) आणि कांचन सोळंकी (35) या दोघांचा मृत्यू झाला असून त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
नालासोपारा पश्चिमेतील हनुमान नगर परिसरात असलेल्या ‘साई महिमा’ या इमारतीतील खोली क्रमांक 401 मध्ये हे दोघे 2022 पासून एकत्र राहत होते. दीपक जोगडिया हा विवाहित असून त्याला बारा वर्षांचा मुलगाही आहे. मात्र वैवाहिक नात्यात गंभीर वाद निर्माण झाल्याने तो पत्नीपासून वेगळा राहू लागला आणि कांचनसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. दोघांचे आपसातील संबंध स्थिर असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले, मात्र आत्महत्येच्या थोड्याच वेळ आधी काही वाद झाला होता का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
हेही वाचा : पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनंतर आता अजितदादांचे दुसरे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? कुठून लढणार?
रविवारी रात्री अंदाजे मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांनी अचानक चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. आवाज ऐकून इमारतीतील रहिवासी बाहेर आले आणि त्यांनी तातडीने दोघांना जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबाकडे कोणते मानसिक किंवा आर्थिक तणाव होते का, याचीही पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. आत्महत्येपूर्वी कोणताही वाद, तणाव किंवा अन्य कारण असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. मोबाईल फोनमधील माहिती, शेजाऱ्यांचे जबाब आणि कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे आत्महत्येचे खरे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नालासोपाऱ्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा मानसिक आरोग्य, वैवाहिक तणाव आणि नातेसंबंधातील गुंतागुंत या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या तपासानंतर या जोडप्याने उडी मारण्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
ADVERTISEMENT











