पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनंतर आता अजितदादांचे दुसरे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? कुठून लढणार?
Ajit Pawar son Jay Pawar : पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनंतर आता अजितदादांचे दुसरे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? कुठून लढणार?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनंतर आता अजितदादांचे दुसरे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
अजित पवारांचे दुसरे चिरंजीव जय पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा
Ajit Pawar son Jay Pawar, Baramati : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या राजकारणातल्या एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर यांनी देखील याबाबत दुजोरा दिला आहे. "जय पवार यांच्या नावाचा जनतेतून रेटा आहे. ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील असा विश्वास बारामतीकरांना वाटतोय. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांचं नाव नगराध्यक्षपदीसाठी जाहीर झाले तर त्यांनी राजकारणात एन्ट्री का घेऊ नये?" असं गारठकर म्हणाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि थोरले पुत्र पात्र पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. दोघांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आता जय पवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना करावा लागला होता पराभवाचा सामना
बारामती लोकसभा मतदारसंघातील 2024 ची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात लक्षवेधी लढत ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटातील सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची सामना झाला. पवार कुटुंबातील हा थेट सामना राज्यभर चर्चेचा विषय ठरला. अजित पवारांच्या बंडानंतर पवार कुटुंबात निर्माण झालेल्या राजकीय फाटाफुटीचा निकाल या निवडणुकीत दिसून आला. दोन्ही बाजूंनी ताकदीनं प्रचार करण्यात आला, तर बारामतीतील प्रत्येक गावात भावनिक आणि प्रतिष्ठेची लढत रंगली. शेवटी सुप्रिया सुळे यांनी अनुभवी राजकारणी म्हणून जनतेचा विश्वास संपादन करत विजय मिळवला, तर सुनेत्रा पवार यांनी पराभव पत्करला या निकालानं बारामतीत पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्षाची झलक दिसली, तसेच मतदारांनी परंपरागत शरद पवारांच्या विचारांना पाठिंबा दिला, असा संदेश या निवडणुकीतून गेला.










