नांदेड हादरलं! 'घर माझ्या नावावर का करत नाहीस?' सख्ख्या भावाकडून भयंकर कांड

Nanded Crime : कौटुंबिक संपत्तीच्या वादातूनच सख्ख्या भावाने सख्ख्या भावाच्या नरडीचा गोठ घेतल्याची धक्कादायक घटना आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

Nanded Crime

Nanded Crime

मुंबई तक

10 Nov 2025 (अपडेटेड: 10 Nov 2025, 06:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

घराच्या मागणीवरून आशिष पाटीलवर लाकडाने प्राणघातक हल्ला 

point

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Nanded Crime : कौटुंबिक वाद हा अनेकांच्या घरात असतोच, पण याच कौटुंबिक संपत्तीच्या वादातूनच सख्ख्या भावाने सख्ख्या भावाच्या नरडीचा गोठ घेतल्याची धक्कादायक घटना आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणात मयताचे नाव आशिष शंकरराव पाटील (वय 28) असे आहे. तर ज्याने आपल्याच सख्ख्या भावाला संपवलं त्याचे नाव  अरुण पाटील (वय 30) असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अमरावतीत रस्त्यात श्वान आडवं आलं, अस्थी विसर्जनासाठी चाललेला ट्रक उलटला, 20 जणांपैकी 17...

घराच्या मागणीवरून आशिष पाटीलवर लाकडाने प्राणघातक हल्ला 

धर्माबाद येथील शंकरगंज येथील नाव आपल्या नावे करुन द्यावे, अशी मागणी अरुण पाटील यांनी आशिष पाटीलकडे केली होती. याच मुद्द्यावरून गेली काही वर्षांपासून वाद सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास आरोपी अरुण पाटीलने आशिष पाटीलवर लाकडाने डोक्यासह, तोंडावर आणि पायावर प्राणघातक हल्ला करत ठार केले. ही घटना सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. 

हे ही वाचा : पत्नीचं बाहेर लफडं सुरु असल्याचा पतीला संशय, क्रिकेटच्या बॅटनेच केला प्राणघातक हल्ला, महिलेला जागेवरच केलं ठार

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित प्रकरणात आरोपीचा सावत्र भाऊन शंकरराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात पोलीस निरीक्षक लता पगलवाड यांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु ठेवला आहे. 

    follow whatsapp