पत्नीचं बाहेर लफडं सुरु असल्याचा पतीला संशय, क्रिकेटच्या बॅटनेच केला प्राणघातक हल्ला, महिलेला जागेवरच केलं ठार
Hyderabad crime : हैदराबाद शहरातील अमीनपूर येथील केएसआर नगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी रिअल इस्टेट व्यवसायिकाने आपल्याच पत्नीच्या डोक्यात बॅटने हल्ला करत हत्या केली. या हत्येचं कारण आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने प्राणघातक हल्ला
विवाहबाह्य संबंधाच्या संशयाचं भूत
Hyderabad Crime : हैदराबाद शहरातील अमीनपूर येथील केएसआर नगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी रिअल इस्टेट व्यवसायिकाने आपल्याच पत्नीच्या डोक्यात बॅटने प्राणघातक हल्ला करत हत्या केली. या हत्येचं कारण आता समोर आलं आहे. विवाहबाह्य संबंधातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून पती - पत्नी या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. रविवारी दुपारी या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका भयानक होता की, पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. हत्या करणाऱ्या पतीचं नाव ब्रह्माय्या आणि पत्नीचं नाव कृष्णादेवी असे आहे.
हे ही वाचा : सांगलीत अग्नीतांडव! विटा शहरात तीन मजली इमारतीला आगडोंब, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
कृष्णावेणीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने प्राणघातक हल्ला
दोघांमधील झालेल्या वादात पती ब्रह्मय्याने कथितपणे कृष्णावेणीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कृष्णावेणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कृष्णावेणी कोहिर ही DCCB बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. मयत कृष्णावेणी हे त्यांच्या 2 मुलांसह केएसआर नगरस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची एक मुलगी ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. तसेच मुलगा हा इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत होता. ब्रह्माय्या एक रिअल इस्टेट व्यवसायिक म्हणून कार्यरत होते, तसेच कृष्णावेणी ही बँकेत नोकरी करत होती.
विवाहबाह्य संबंधाच्या संशयाचं भूत
संबंधित प्रकरणात, पती-पत्नी यांच्यात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून वाद होत होता. रविवारी दुपारी दोघांमध्ये त्यांच्यात याच विषयावरून वादंग निर्माण झाला होता. या वादात टोकाचं रुप धारण करून क्रोधाच्या भरात आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. त्यातच कृष्णावेणीच्या आईचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : राज्यातील 'या' विभागात तापमानाचा पारा पडणार, काही भागांत गुलाबी थंडी वाढणार
संबंधित घटनेची माहिती पोलिसाना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.










