Nanded Crime : नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील हिमायनगरमध्ये एका 17 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह हा विहिरीत फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं नांदेड हादरून गेलं आहे. प्रेमप्रकरणातून ही क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खून करून तो मृतदेह एका पोत्यात भरण्यात आला भोकर तालुक्यातील शिंगारवाडी शिवारातील विहिरीत फेकून देण्यात आला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सरकारी शिक्षकाकडून गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह दुचाकीवरून चार जिल्ह्यांत फिरवला, 'त्या' एका फोटोवरून...
मुलीसोबत प्रेमसंबंध
मृत मुलाचे नाव नकुल संजय पावडे (वय 17) असे आहे. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. शनिवारी रात्रीपासून नकुल आपल्या राहत्या घरी परतलाच नाही. या काळजीने नकुलच्या वडिलांनी तामसा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीनुसार, तपास सुरु केला असता, मंगळवारी नांदेड गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली.
आरोपीकडून गुन्ह्याचा कबुलीनामा
या एकूण माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता, गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. आरोपी गणेश संभाजी दारेवाड (वय 39) याची मुलगी आणि दुसरा आरोपी विशाल गणेश दारेवाड वय (19) यांच्या बहिणीसोबत नकुलचे प्रेमसंबंध होते. यातूनत आम्ही त्याचा खून केल्याचे कारण त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी बीडमधील आंदोलकांचा पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा, सुषमा अंधारेंनी थांबवलं अन्...
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी हाके यांच्यासह सहय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडेकर, पोलीस अपनिरीक्षक नरोटे शिंगारवाडी शिवारातील घटनास्थळी गाठले. स्थानिकांच्या मदतीने नकुलचे शव विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले.
ADVERTISEMENT











