Govt Jobs : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरीची संधी, पात्रतेचे निकष काय?

मुंबई तक

• 03:03 PM • 23 May 2026

करन्सी नोट प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदांच्या एकूण 534 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार विविध क्षेत्रांतील उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

Government Jobs

Government Jobs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरीची संधी

point

पात्रतेचे निकष काय?

Government Jobs : करन्सी नोट प्रेस नाशिक (CNP Nashik SPMCIL) अंतर्गत कनिष्ठ तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सचिवालयाचे सहाय्यक, आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन), कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक यांसह विविध पदांच्या एकूण 534 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, शैक्षणिक पात्रतेनुसार विविध क्षेत्रांतील उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांच्या गरजेनुसार निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI), संबंधित क्षेत्रातील पदविका (Diploma), पदवीधर (Graduate) आणि पदव्युत्तर पदवी (Post Graduate) धारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे असावी, तर कमाल वयोमर्यादा पदाच्या स्वरूपानुसार 25, 28 किंवा 30 वर्षांपर्यंत निश्चित केली गेली आहे. तसेच शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत लागू असेल.

हे ही वाचा : विद्यार्थिनीला हॉटेलवर नेलं, भांगेत कुंकू भरलं अन् नको तेच.. अश्लील Video व्हायरल

अर्जाची अंतिम मुदत काय?

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. इच्छुक उमेदवारांना करन्सी नोट प्रेस नाशिकच्या अधिकृत वेबसाईट cnpnashik.spmcil.com वर जाऊन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 20 एप्रिल रोजी झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून आता 3 जूनपर्यंत करण्यात आली आहे. उमेदवारांना 3 जून पर्यंतच परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन माध्यमातून जमा करता येणार आहे.

हे ही वाचा : टॉयलेटमध्ये अडकलं नवजात बाळ, 14 वर्षीय आईनं हे काय केलं?

वेतन किती?

अर्ज शुल्काचा विचार केलास, खुल्या (UR), आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. वेतनश्रेणी विविध पदांसाठी वेगवेगळी निश्चित करण्याता आली आहे.