टॉयलेटमध्ये अडकलं नवजात बाळ, 14 वर्षीय आईनं हे काय केलं?

मुंबई तक

एका रुग्णालयातील स्वच्छतागृहात एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ एकच गोंधळ आणि खळबळ उडाली. यानंतर त्या स्वच्छतागृहातील दृश्य बघून सर्वांनाच धक्का बसला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

टॉयलेटमध्ये अडकलं नवजात बाळ

point

हे काय केलं?

Crime News : झारखंडमधील गिरीडीह जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रुग्णालयातील स्वच्छतागृहात एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ एकच गोंधळ आणि खळबळ उडाली. मात्र, रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे स्वच्छतागृहातील सीटमध्ये अडकलेल्या नवजात बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सध्या माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आणि सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

पळून जाताना आली चक्कर

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (22 मे) सदर रुग्णालयाच्या वॉर्ड परिसराजवळ असलेल्या स्वच्छतागृहातून एक अल्पवयीन मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडताना दिसली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि स्वच्छतागृहाच्या आत व बाहेर रक्ताचे थारोळे पडले होते. हे भयानक दृश्य पाहून लोकांना काहीतरी अघटीत घडल्याची शंका आली. याच दरम्यान त्या मुलीने रुग्णालय परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु काही अंतरावर जाताच ती चक्कर येऊन बेशुद्ध पडली.

हे ही वाचा : नागपूर : 'तू ATM मधून पैसे का काढलेस?' रागावलेल्या नातवाने आजीसोबत काय केलं बघा..

स्वच्छतागृहातील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का

तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने रुग्णालय प्रशासनाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाचे कर्मचारी आणि नगर ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वच्छतागृहाची तपासणी केली असता आतील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. एक नवजात बालक स्वच्छतागृहाच्या सीटमध्ये अडकलेले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे तातडीने मदतकार्य सुरू केले आणि अथक प्रयत्नांनंतर नवजात बालकाला सुखरूप बाहेर काढले.

हे ही वाचा : लग्नानंतर 12 दिवसांतच वहिनीवर जडला जीव, नकार देताच दीराने.., हादरवून टाकणारं प्रकरण

तिच्यासोबत काय घडलं?

यानंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून अल्पवयीन माता आणि नवजात बालकाला तातडीने पुढील उपचारासाठी चैताडीह येथील माता बाल रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे दोघांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सदर रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. प्रदीप बैठा यांनी सांगितले की, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे माता आणि बाळ दोघांचेही प्राण वाचले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी रतन कुमार सिंह यांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला असून, त्या अल्पवयीन मुलीसोबत काही गुन्हा घडला आहे का, यासह सर्व बाजूंची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
 

हे वाचलं का?