लग्नानंतर 12 दिवसांतच वहिनीवर जडला जीव, नकार देताच दीराने.., हादरवून टाकणारं प्रकरण
लग्नाच्या अवघ्या बारा दिवसानंतर दीराने आपल्या वहिनीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र वहिनीने कडाडून विरोध करताच दीराचा पारा चढला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नानंतर 12 दिवसांतच वहिनीवर जडला जीव
नकार देताच दीराने..
हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : नात्यांना काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दीराने आपल्याच लहान भावाच्या बायकोवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये अपयश आल्यानंतर त्याने चिडून कुऱ्हाडीने वार करत तिची निर्घृण हत्या केली. या घटनेतील मृत महिलेची ओळख 23 वर्षीय सरिता अशी झाली असून, अवघ्या 12 दिवसांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील सिवनी परिसरातील ही घटना आहे.
लग्नानंतर 12 दिवसातच...
मृत सरिताचा पती बबलू याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी तो घरात नव्हता. याच संधीचा फायदा घेत त्याच्या मोठ्या भावाने घराचा दरवाजा आतून बंद केला. यानंतर आरोपीने सरितावर जबरदस्ती करण्याचा आणि तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरिताने स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्याला कडाडून विरोध केला आणि त्याच्या वासनेला बळी पडण्यास स्पष्ट नकार दिला.
हे ही वाचा : अंगणात रक्ताचा सडा, 16 वर्षीय मुलगीही गायब; 'त्या' कुटुंबात नेमकं काय घडलं?
नकार सहन झाला नाही
सरिताने दाखवलेल्या या प्रखर विरोधामुळे आरोपीचा राग अनावर झाला. त्याने घरातच शेजारी ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि सरिताच्या गळ्यावर जोरदार वार केले. हा वार इतका भीषण होता की, गंभीर रक्तस्राव झाल्याने सरिताचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला. या संपूर्ण क्रूर कृत्याची सर्वात वेदनादायक बाजू म्हणजे, घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेली मृत सरिताची चिमुरडी भाची या संपूर्ण रक्तपाताची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरली आहे. बबलू जेव्हा घरी पोहोचला, तेव्हा रडत असलेल्या या निष्पाप मुलीने घडलेला सर्व थरार त्याला सांगितला. या प्रकरणात चिमुरडीची साक्ष अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
हे ही वाचा : डॉक्टरने विद्यार्थीनीला इंजेक्शन दिलं, कुटुंबिय बाहेर बसलेले असताना.., भयंकर प्रकार!
मानसिक आजार
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासादरम्यान बबलूने सांगितले की, त्याचा मोठा भाऊ मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. मात्र, पोलीस या दाव्याची पडताळणी करत असून सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.









