डॉक्टरने विद्यार्थीनीला इंजेक्शन दिलं, कुटुंबिय बाहेर बसलेले असताना.., भयंकर प्रकार!

मुंबई तक

Crime News : एका विद्यार्थिनीला गुंगीचं इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली असून,सरकारने आरोपीवर मोठी कारवाई केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरने विद्यार्थीनीला इंजेक्शन दिलं

point

कुटुंबिय बाहेर बसलेले असताना.., भयंकर प्रकार!

Crime News :  वैद्यकीय क्षेत्राला लाजवणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्पिटल'मध्ये उपचारासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीसोबत तिथल्याच एका नराधम डॉक्टरने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी डॉक्टरवर पीडित मुलीला उपचाराच्या बहाण्याने गुंगीचे इंजेक्शन देऊन थेट ऑपरेशन थिएटरमध्ये तिचे लैंगिक शोषण केल्याचा अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आला आहे. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये 18 मे रोजी घडली. 

हेही वाचा : 'आता आत्म्याचे सावट दूर झाले,' भावाला बाहेर काढले अन् बंद खोलीत वहिणीसोबत..

प्रकरणाचे गांभीर्य आणि संताप लक्षात घेता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक यांनी तेजस रुग्णालय तात्काळ सील करण्याचे आदेश दिले आहे. याशिवाय नराधम आरोपी डॉक्टरची वैद्यकीय पदवी (मेडिकल डिग्री) कायमस्वरूपी जप्त करण्याचे कडक निर्देश प्रशासनाला जारी केले आहेत.

प्रकृती खालावल्यामुळे पीडित विद्यार्थिनीला उपचारासाठी तेजस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आरोपी डॉक्टर विजय गिरी याने उपचाराचा बहाणा करून पीडित मुलीला ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये एकटे बोलावून घेतले. आरोपी डॉक्टरने आधी तिथे उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना (स्टाफ) आणि मुलीच्या वडिलांना खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले. सर्व जण बाहेर गेल्यानंतर आरोपीने ऑपरेशन थिएटरमध्ये एकटी असलेल्या या विद्यार्थिनीला आधी गुंगीचे इंजेक्शन दिले आणि त्यानंतर तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर कथितपणे बलात्कार केला.

हेही वाचा : इंटेलिजन्स ब्युरोचा इशारा, अन् कॉकरोज जनता पार्टीचं X हँडल बंद, इन्स्टा अकाऊंटवरही कारवाई?

नशील्या इंजेक्शनचा अंमल हळूहळू कमी झाल्यानंतर आणि संपूर्ण शुद्धीवर आल्यानंतर पीडित विद्यार्थिनीला आपल्यासोबत घडलेल्या या भयानक आणि अमानुष कृत्याची जाणीव झाली. तिने तात्काळ घडलेली सर्व आपबीती आपल्या कुटुंबीयांना सांगितली, ज्यानंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी थेट पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवली. या प्रकरणाची माहिती देताना उत्तर प्रदेशच्या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (नॉर्थ) ट्विंकल जैन यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. मूळचा सीतापूर जिल्ह्यातील तंबौर परिसराचा रहिवासी असलेल्या आरोपी डॉक्टर विजय गिरी याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत.

हे वाचलं का?