नाशिक पुन्हा हादरले! दारु पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार, 'गजवा-ए-हिंद'चा उल्लेख केल्याचा आरोप

मुंबई तक

18 Apr 2026 (अपडेटेड: 18 Apr 2026, 05:58 PM)

नाशिकमधील एका आयटी कंपनीतील प्रकरण ताजं असतानाच त्याच प्रकारचं दुसरं प्रकरण उघडकीस आलं आहे. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

Nashik Crime

Nashik Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नाशिक पुन्हा हादरले!

point

दारु पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार

point

गजवा-ए-हिंदचा उल्लेख केल्याचा आरोप

Nashik Crime, प्रवीण ठाकरे : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका आयटी कंपनीतील प्रकरण ताजं असतानाच त्याच प्रकारचं दुसरं प्रकरण उघडकीस आलं आहे. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या तक्रारीत तरुणीने म्हटलं आहे की, तंजीर इनामदार नावाच्या एका तरुणाने तिचे लैंगिक शोषण केले असून तिच्या गळ्यातील माळ काढून नंतर तिच्यावर अत्याचार केले.

हे वाचलं का?

दारु पाजून लैंगिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तंजीर इनामदार याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने दारु पाजली आणि सिगारेटही ओढायला लावली. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच संशयिताने पीडितेच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि हातात बांधलेले धार्मिक धागे तोडून फेकून दिले. पीडितेने असाही आरोप केला आहे की, गजवा ए हिंदच्या नावावर एका धार्मिक रीती-रिवाज मान्य करण्यास भाग पाडले. तसेच मानसिक आणि शारीरिकरित्या टॉर्चर केले.

हेही वाचा : थारचा अपघात झाला नव्हता, मेहुणा आणि मेहुणीच्या अफेअरमुळे झालं खुनी कांड, कसा झाला खुलासा?

वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार

जानेवारी 2026 मध्ये संशयिताने पीडितेच्या गळ्यावर दाताने चावले होते आणि त्याचा फोटोही त्याने काढला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार केला. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिस स्टेशन गाठले. अजून काही मुलींना आरोपीने फसवले असल्याची शंका पोलिसांना आहे. दरम्यान, एका पीडितेने समोर येऊन तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत. आज संशयित आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : माहेरी असतानाच नवऱ्याने नर्सची केली हत्या, इंजेक्शन देऊन जीव घेतला, नेमकं कारण काय?

नाशिकमध्ये खळबळ

या घटनेमुळे शहरात लव जिहाद आणि बळजबरीने धर्मांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. शांत आणि धार्मिक शहर मानले जाणाऱ्या नाशिकमध्ये अशा प्रकरणांमुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

न्यायालयातील युक्तिवाद

तपास अधिकारी: बी. टी. अगवाणे (पोलीस निरीक्षक)

जेव्हा न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना विचारले की, आरोपीची पोलिसांविरुद्ध कोणतीही तक्रार नाही ना? त्याने इतर कोणाची फसवणूक केली आहे का? त्याला कोणती आर्थिक मदत मिळाली आहे का? त्याला जिथे जिथे नेण्यात आले, त्या सर्व ठिकाणांची चौकशी झाली पाहिजे.

ॲडव्होकेट मनीषा वारुंगसे (सरकारी वकील)

"आम्हाला तपास करायचा आहे की त्याने यापूर्वी इतर मुलींची फसवणूक केली आहे का? विविध लॉजमध्ये राहण्यासाठी, महागडी दारू आणि इतर खर्चासाठी त्याला इतके पैसे कोठून मिळाले, याचाही आम्हाला शोध घ्यायचा आहे. असे सांगण्यात आले आहे की, लॉजमध्ये जेव्हा ती नकार द्यायची, तेव्हा तो तिच्या मानेवर कापायचा आणि विचारले असता सांगायचा की हा 'लव्ह बाईट' आहे. त्याने स्वतःच्या धर्माचा उल्लेख करत असेही म्हटले की त्याला 'गजवा-ए-हिंद' करायचे आहे. हे प्रकरण एखाद्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीशी (Multinational Company) संबंधित प्रकरणासारखे आहे का, हे आम्हाला तपासायचे आहे."

ॲडव्होकेट स्वप्निल रामचंद्र जाधव (आरोपीचे वकील)

"तंजीरवर जे आरोप लावले आहेत की त्याने पीडितेला सिगारेट आणि दारू देऊ केली, त्याचा कोणताही पुरावा नाही. संशयितावर सर्व आरोप खोटे लावण्यात आले आहेत. तक्रारदाराने 90 दिवस का वाया घालवले? कॉलेजसमोर पोलीस चौकी आहे, तिथे तक्रार का केली नाही? हे गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. जेव्हा घरच्यांना याबद्दल कळाले, तेव्हा त्यांनी दबावाखाली ही केस दाखल केली आहे. या पलीकडे दुसरे काहीही नाही, हे निव्वळ प्रेमप्रकरण आहे आणि प्रेम धर्म पाहून होत नाही," असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला.