Shakti Cyclone: नवं संकट! 'शक्ती' चक्रीवादळ येतंय, महाराष्ट्राच्या 'या' भागांना धोका!

शक्ती चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. पण त्याचा नेमका परिणाम महाराष्ट्रावर कसा होणार हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:12 PM • 16 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

बंगालच्या उपसागरात तयार होतंय शक्ती चक्रीवादळ

point

शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम करणार?

point

शक्ती चक्रीवादळ नेमकं कधी धडकणार?

मुंबई: नैऋत्य मान्सून आता अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे. ज्यामुळे नाशिक, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट भागात ढग दिसून आले. तर दुसरीकडे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ प्रदेशात विखुरलेले मेघगर्जनेसह पाऊस बरसत आहे. 

हे वाचलं का?

एकंदरीतच मागील काही दिवसांपासून पावसानं महाराष्ट्रात धडक मारली आहे. आणि आता महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांसाठी एक धोक्याची घंटा वाजत आहे. ज्यामुळे 'शक्ती' चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा>> इथे नवऱ्या मुलाची व्हर्जिनिटी तपासते नवरीची 'काकी', आधी काकीसोबत संबंध अन् नंतर मुलीसोबत लग्न!

माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होतं आहे. त्याचं नाव 'शक्ती' असं सांगितलं जात आहे. याचा महाराष्ट्रात परिणाम होणार आहे का? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

'शक्ती' चक्रीवादळाचा कोणकोणत्या राज्यावर परिणाम होणार?

मान्सून आता अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात  पोहोचला आहे. अशातच 23 ते 28 मे दरम्यान ते चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. याचा परिणाम अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांवर होऊ शकतो.

हे ही वाचा>> Viral Video: हळदीत बैल आणला, चिक्कार पैसा उडवला.. चिडलेल्या बैलाने करवल्यांनाच उडवलं!

बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे दरम्यान  प्रचंड वेगाने चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. या संभाव्य चक्रीवादळाचे नाव ‘शक्ती’ असे असेल. संभाव्य यासाठी म्हटलं जातंय कारण आयएमडीनं अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, हवामानाचे अंदाज अनेकदा अंदाजच राहतात हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे. शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे विकसित होऊन चक्रीवादळाचे रूप घेऊ शकते, असं तज्ञांचं मत आहे.

कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने 16 मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला आहे. इकडे महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये गडगडाटासह पाऊस पडू शकतो. चक्रीवादळाआधी  महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

पाऊस सुरु देखील असल्याचं आपण पाहतोय. त्यामुळं चक्रीवादळ जर आलं तर पावसाची तीव्रता देखील वाढू शकते तसंच किनारपट्टीच्या भागाला याचा तडाखा बसू शकतो असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे. त्यामुळं काळजी घ्या.

    follow whatsapp