Govt Bank Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी मोठ्या भरतीची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) कडून लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या 2500 पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या, सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 24 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी केवळ ऑनलाइन माध्यमातूनच उमेदवारांना अर्ज करता येतील. भरतीसाठी पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
पात्रता
या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी (Graduation) ची डिग्री असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे किमान 1 वर्ष व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेशी जोडलेल्या क्षेत्रात कामाचा अनुभव असायला हवा.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे वय असणं अनिवार्य आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. म्हणजेच एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 3 वर्षे सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: आईची क्रूरता! 4 वर्षांच्या मुलीला स्टीलच्या रॉडने वार करत... कारण ऐकून थक्क व्हाल
अर्जाचे शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्याचे शुल्क देखील निश्चित करण्यात आले आहे. सामान्य (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावे लागेल.
हे ही वाचा: परिसीमेचा कळस! चॉकलेट बिस्किटांचं लहान मुलीला दाखवलं आमिष, मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओज् दाखवून...नको तेच
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल. पहिला टप्पा लेखी परीक्षा असेल ज्यामध्ये इंग्रजी, बँकिंग जागरूकता, सामान्य ज्ञान, तर्क आणि परिमाणात्मक अभियोग्यता यासारख्या विषयांवरून 120 प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल. यानंतर, एक सायकोमेट्रिक टेस्ट घेतली जाईल, ज्यामध्ये उमेदवाराची मानसिक क्षमता आणि व्यावसायिक विचारसरणी तपासली जाईल. शेवटी, मुलाखत किंवा ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून अंतिम निवड केली जाईल.
ADVERTISEMENT
