Govt Job: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ही भारत सरकारची एक स्वायत्त संस्था असून यामध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. NHAI कडून उपव्यवस्थापक (डेप्यूटी मॅनेजर) या टेक्निकल विभागाच्या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक असणारे उमेदवार nhai.gov.in या NHAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
तुम्हाला सुद्धा NHAI च्या या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अधिकृत वेबसाइटवर जाऊन 9 जून 2025 पर्यंत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा. या भरतीअंतर्गत एकूण 60 रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
NHAI मध्ये नोकरीसाठी पात्रता
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून सिव्हिल इंजिनीयरिंगमध्ये ग्रेज्यूएशन (B.E./B.Tech) ची पदवी असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमाल वय 30 वर्षे असणं अनिवार्य आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल.
NHAI मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचं वेतन
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल 10 अंतर्गत 56,100 रुपये ते 1 लाख 77 हजार 500 रुपये वेतन दिलं जाईल. यामध्ये 7 व्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय महागाई भत्ता (CDA) चा देखील समावेश असेल.
हे ही वाचा: भर चौकात कोयते निघाले, दगड भिरकावले... बीडमध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच, नवा व्हिडीओ समोर
निवड प्रक्रिया
1. या भरतीसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात GATE 2025 च्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
2. यामध्ये उमेदवारांनी केलेल्या अर्जांची संख्या जास्त असल्यास GATE गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्ट करण्यात येतील आणि त्यानंतर NHAI कडून त्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
हे ही वाचा: भरधाव कार बंगल्याला धडकली, 5 जण जागीच ठार, लग्नावरुन येताना काळाचा घाला, नेमकं काय घडलं?
अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतलेले अनेक तरुण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. अशा तरुणांसाठी या भरतीच्या अंतर्गत सरकारी नोकरीची ही चांगली संधी आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार NHAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVERTISEMENT
