Govt Job: ITI पास तरुणांनी मिळवा रेल्वेत नोकरी... तब्बल 6238 पदांसाठी बंपर भरती

रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून टेक्नीशियनच्या 6000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार RRB च्या rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

ITI पास तरुणांनी मिळवा रेल्वेत नोकरी... तब्बल 6238 पदांसाठी बंपर भरती

ITI पास तरुणांनी मिळवा रेल्वेत नोकरी... तब्बल 6238 पदांसाठी बंपर भरती

मुंबई तक

• 01:20 PM • 22 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ITI पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी

point

टेक्नीशियन पदासाठी 6000 हून अधिक जागांसाठी बंपर भरती

RRB recruitment 2025: 10 वी नंतर ITI पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून टेक्नीशियनच्या 6000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार  RRB च्या rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

रेल्वे विभागाच्या या भरतीसाठी उमेदवार 28 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच, 30 जुलै ही अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अर्जात सुधारणा करायची असल्यास 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान उमेदवार फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात. 

RRB ने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, या भरतीअंतर्गत एकूण 23 पदांवरील 6238 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये टेक्नीशियन ग्रेड-I सिग्नल पदाच्या 183 रिक्त जागा आणि टेक्नीशियन ग्रेड-III पदाच्या एकूण   6055  रिक्त जागांचा समावेश करण्यात आला आहे.  यामधील टेक्निकल ग्रेड III फिटर (PU & WS) या पदावर सर्वाधिक म्हणजेच 2106 रिक्त जागांवर भरती करण्यात आली आहे. उमेदवार नोटिफिकेशन मधून सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. 

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे अभियांत्रिकीमध्ये म्हणजेच इंजिनीयरिंगमध्ये B.E/B.Tech, इंजिनीयरिंग डिप्लोमा किंवा B.Sc पदवी असणं आवश्यक आहे. टेक्नीशियन ग्रेड-III (ओपन लाइन, वर्कशॉप आणि पीयू) साठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह दहावी उत्तीर्ण किंवा PCM विषयांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

हे ही वाचा: 10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, निर्जनस्थळी नेलं अन्... मुंबईतील धक्कादायक घटना

वयोमर्यादा

टेक्नीशियन ग्रेड-I सिग्नल साठी 1 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आणि टेक्नीशियन ग्रेड-III पदांसाठी 18 ते 30 वर्षे दरम्यान वय असणं अनिवार्य आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देखील देण्यात येईल. 

RRB टेक्नीशियन पदासाठी वेतन

टेक्नीशियन ग्रेड-I सिग्नल पदासाठी वेतन स्तर-5 अंतर्गत दरमहा 29,200 रुपये आणि टेक्नीशियन ग्रेड-III पदासाठी वेतन स्तर-2 अंतर्गत दरमहा 19,900 रुपये वेतन देण्यात येईल.

हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या आड येत होता पती, प्रियकराच्या साथीने संपवलं अन् घरातंच पुरून...

कसा कराल अर्ज? 

सर्वप्रथम rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 

होमपेजवरील 'CEN No. 02/2025 - टेक्नीशियन भरती 2025' वर क्लिक करा. 

आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घ्या. 

जनरेट झालेल्या क्रेडेंशियल्सच्या मदतीने लॉगिन करून फॉर्म भरा. 

त्यानंतर तुमचे डॉक्यूमेंट्स अपलोड करा. 

अर्जाचं शुल्क भरून फॉर्म भरा आणि सबमिट करा. 


 

    follow whatsapp