Govt Job: सरकारी बँकेत नोकरी हवीये? 'या' भरतीसाठी करा अप्लाय... अर्जाची शेवटची तारीख काय?

इंडियन बँकने अप्रेंटिसच्या 1500 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 18 जुलै 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 7 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

सरकारी बँकेत नोकरी हवीये? 'या' भरतीसाठी करा अप्लाय...

सरकारी बँकेत नोकरी हवीये? 'या' भरतीसाठी करा अप्लाय...

मुंबई तक

20 Jul 2025 (अपडेटेड: 20 Jul 2025, 02:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी 'या' भरतीसाठी करा अप्लाय

point

काय आहे अर्जाची शेवटची तारीख?

Indian Bank Vacancy: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन बँकने अप्रेंटिसच्या 1500 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 18 जुलै 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 7 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. www.indianbank.in या अधिकृत वेबसाइटवर आणि NATS पोर्टलवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

देशभरातील विविध शाखांसाठी अप्रेन्टिस पदांची ही भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार त्यांच्या राज्यातील रिक्त पदे लक्षात घेऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

पात्रता

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे. कोणत्याही विषयात ग्रॅज्युएट असलेले उमेदवार बँकेतील अप्रेन्टिसशिपच्या या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा

या भरतीसाठी 1 जुलै 2025 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 

हे ही वाचा: पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास केवळ 'इतक्या' तासांत... सरकारकडून मोठी अपडेट!

स्टायपेंड

मेट्रो/ शहरी शाखा: 15,000 रुपये
ग्रामीण/ सेमी शाखा: 12,000 रुपये

अर्जाचं शुल्क

अर्ज करण्यासाठी सामान्य (General)/ओबीसी (OBC)/ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 800 रुपये तर एससी (SC)/एसटी (ST)/पीडब्ल्यूडी (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावं लागेल. 

हे ही वाचा: अनैतिक संबंधाने केला घात! आधी पतीला संपवलं अन् मुलांना घेऊन भलत्याच पुरुषासोबत गेली पळून...

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिने म्हणजेच 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाईल. 

निवड प्रक्रिया

अप्रेन्टिसच्या पदासाठी दोन टप्प्यात उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची ऑनलाईन म्हणजेच कंप्यूटर बेस्ड परीक्षा घेण्यात येईल. त्यासोबतच स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी (लोकल लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्ट) आयोजित केली जाईल. 

    follow whatsapp