Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा 'नाबार्ड'मध्ये नोकरी! महिन्याला 3.85 लाख रुपये पगार अन्...

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) कडून स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

महिन्याला 3.85 लाख रुपये पगार अन्...

महिन्याला 3.85 लाख रुपये पगार अन्...

मुंबई तक

• 12:45 PM • 20 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा 'नाबार्ड'मध्ये नोकरी!

point

महिन्याला 3.85 लाख रुपये पगार अन्...

point

कधीपर्यंत कराल अर्ज?

Govt Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) कडून स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 

हे वाचलं का?

आरएमडी (RMD), डीओआर (DOR), डीडीएमएबीआई (DDMABI), डीआईटी (DIT), डीईएआर (DEAR) अशा विविध विभागांत नाबार्डची ही भरती निघाली आहे.  

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. अॅडिशनल चीफ रिक्त मॅनेजर पदासाठी उमेदवारांकडे इकोनॉमिक्स मध्ये पोस्ट ग्रेजुएट/ स्टॅटिक्स/ फाइनान्स/ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन/ एमबीए/ पीजीडीआय/ सीए/ सीएस क्षेत्रात मध्ये डिग्री असण्यासोबतच 10 वर्षांचा बँकिंग अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच, रिक्स मॅनेजर पदासाठी फायनान्स क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/ कॉमर्स/ इकोनॉमिक्स/ स्टॅटिक्स/ मॅथेमेटिक्स/ मॅथेमेटिकल स्टॅटिक्स/ एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीडीएम किंवा इंजीनिअरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीसह 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. 

याशिवाय, मार्केट रिस्कसाठी फायनान्स पदांसाठी ग्रॅजुएट/ कॉमर्स/ इकोनॉमिक्स/ स्टॅटिक्स/ इकोनॉमेट्रिक्स/ मॅथेमेटिक्स/ मॅथेमेटिकल स्टेटिक्स/ एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीपीएम/ पीजीडीएम मध्ये पदवीसह संबंधित क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतर, पदांसाठीची शैक्षणिक पात्रता सविस्तर जाणून घेण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात. 

वयोमर्यादा

पदानुसार, 28 ते 62 वर्षे 

पगार:  दरमहा 1.50 लाख ते 3.85 लाख रुपये 

हे ही वाचा: अमरावती: भररस्तात 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या! घटनेनंतर, संतप्त टोळक्याची परिसरात दहशत...

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम www.nabard.org या अधिकृत वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. 
2. यासाठी New Registration टॅबवर जाऊन बेसिक माहिती भरा. 
3. आता रजिस्ट्रेशन नंबरच्या साहाय्याने लॉगिन करा. 
4. त्यानंतर, फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरा. 
5. माहिती भरल्यानंतर, फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि लेखी डिक्लेरेशन स्कॅन करून अपलोड करा. 
6. शेवटी, प्रवर्गानुसार अर्जाची फी भरा आणि फायनल प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा. 

हे ही वाचा: Nagar Parishad Voting LIVE: आज 'या' नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान सुरू... आतापर्यंत मतदानाची टक्केवारी किती?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 850 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी (SC), एसटी (ST), पीडब्ल्यूबीडी (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये शुल्क भरावं लागेल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

    follow whatsapp