Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची लाट अजूनही कायम असून, 19 डिसेंबरला किमान तापमानात 1-2 अंश सेल्सिअसची किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही राज्यभरात थंड वातावरण राहणार असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तास गंभीर असल्याचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मोठी बातमी: माणिकराव कोकटेंचा 'गेम ओव्हर', मुख्यमंत्री नाही तर 'या' नेत्याकडे दिला राजीनामा; कोणत्याही क्षणी होणार अटक
कोकण विभाग :
कोकण विभागात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ही किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होईल अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागातील पुण, सातारा सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये किमान जिल्ह्यांमध्ये तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सकाळच्या वेळी धुके पाहायला मिळेल.किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील किमान तापमान हे 8 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत होते. या विभागातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यामध्ये थंडाव्या काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : 'ते' वचन देऊन ठेवले लैंगिक संबंध, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर मोठी खळबळ
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागातील नागपूर, अमरावतीसह इतर जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे 2 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. थंडाव्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच नागपूरात 19 डिसेंबर रोजी 12 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











