अनैतिक संबंधाने केला घात! आधी पतीला संपवलं अन् मुलांना घेऊन भलत्याच पुरुषासोबत गेली पळून...

मुंबई तक

झारखंडच्या सराइकेला खरसावामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येनंतर महिला अज्ञात पुरुषासोबत पळून गेल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

अनैतिक संबंधाने केला घात! आधी पतीला संपवलं अन्...
अनैतिक संबंधाने केला घात! आधी पतीला संपवलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीची हत्या

point

मुलांना घेऊन भलत्याच पुरुषासोबत गेली पळून

Crime News: झारखंडच्या सराइकेला खरसावामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा महिलेला संशय आला. त्यामुळे तिने तिच्या पतीचा गळा चिरून त्याला मारून टाकलं आणि नंतर ती तिच्या तीन मुलांना घेऊन एका अज्ञात पुरूषासोबत पळून गेली. नेमकं प्रकरण काय? 

प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव राजेश कुमार चौधरी असून तो गिरिडीह गावाचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. राजेश कोलाबीरातील डीडी स्टीलमध्ये लॅब टेक्निशिअन म्हणून काम करत होता. कामानिमित्ताने तो कुटुंबापासून दूर राहत होता पण नुकतंच सोमवारपासून तो आपल्या पत्नीसोबत राहायला सुरूवात केली होती. 

एकत्र राहण्यासाठी पतीवर दबाव 

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश त्याच्या मित्रांसोबत आदित्यपुरमधील समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहत होता. सोमवारी त्याची पत्नी आपल्या तीन मुलांना सोबत घेऊन आदित्यपूरला पोहोचली आणि पत्नीने राजेशवर तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव आणला. यानंतर राजेशने गोरंगो मुखी नावाच्या व्यक्तीकडून भाड्याने घर घेतले आणि तिथे राजेश आपल्या कुटुंबासोबत राहू लागला. मात्र, राजेशची पत्नी दररोज त्याच्यासोबत भांडत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:  वारंवार शारीरिक संबंध अन् नंतर गोळ्या देऊन... लग्नाचं आमिष दाखवून नवी मुंबईतील तरुणीवर अत्याचार!

हत्येनंतर अज्ञात पुरुषासोबत गेली पळून 

परिसरातील दुकानदाराची चौकशी केली असता, राजेश गुरुवारी त्याच्या दुकानात पनीर आणण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी राजेशने आपला मेव्हणा घरी आल्याचं सांगितलं, अशी माहिती दुकानदाराने दिली. त्याच रात्री राजेशच्या पत्नीने एका अज्ञात व्यक्तीसोबत मिळून पतीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पतीच्या हत्येनंतर आपल्या मुलांना सोबत घेऊन आरोपी महिला एका अज्ञात व्यक्तीसोबत पळून गेल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या मते, हत्येनंतर घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्यामुळे यामागे त्याच्या पत्नीचा हात असू शकतो. शनिवारी घरातून दुर्गंध येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना या सगळ्याची माहिती दिली. 

राजेशच्या भावाने दिली माहिती

राजेशच्या भावाच्या म्हणण्यानुसार, राजेशची पत्नी काही दिवसांपूर्वी गिरिडीहमध्ये तिच्या घरी गेली होती आणि तिथे मोठा वाद झाला आणि त्यात तिने राजेशसोबत राहणार नसल्याचंही सांगितलं होतं. तिचे वर्तन चांगले नाही. आपल्या मुलांना घेऊन सासरच्या घरातून ती आदित्यापुरला गेली होती.

हे ही वाचा: Pune: डेटिंग App वर भेटले 2 तरूण, पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध; अन् नंतर.. पुण्यात भलतीच घटना

पोलिसांचा तपास 

शनिवारी सकाळी शेजाऱ्यांना राजेशच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यावेळी त्यांना राजेशचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. तिथल्या लोकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मते, राजेशच्या हत्येनंतर त्याची पत्नी आपल्या मुलांसोबत फरार आहे. पोलिसांना राजेशच्या पत्नीवर प्राथमिक संशय असून प्रकरणाची तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp