वारंवार शारीरिक संबंध अन् नंतर गोळ्या देऊन... लग्नाचं आमिष दाखवून नवी मुंबईतील तरुणीवर अत्याचार!
नवी मुंबईत उलवेतील एका तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नवी मुंबईत तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार

लग्नाचं आमिष आणि नंतर धमकी देऊन टाकला दबाव

उलवे पोलिसांकडून आरोपीला अटक
Navi Mumbai Crime: नवी मुंबईत उलवेतील एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. इतकेच नव्हे, तर या संबंधातून ती गरोदर राहिली मात्र, तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आलं. या प्रकरणातीला मोहित विरेंद्र सिंग या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार
पीडित तरुणीने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये पीडिताची मोहितशी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. मोहितने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचं आमिष दाखवलं. पीडितेला लग्नाची खोटी स्वप्नं दाखवून आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार झाल्यामुळे पीडिता गरोदर राहिली.
हे ही वाचा: पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास केवळ 'इतक्या' तासांत... सरकारकडून मोठी अपडेट!
गर्भपाताच्या गोळ्या देऊन बळजबरीने...
पीडित तरुणी गर्भवती असल्याचं समजताच मोहितने मेडिकल स्टोरमधून तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. आरोपीने तरुणीला बळजबरीने त्या गोळ्या खायल्या दिल्या आणि गर्भापात करण्यास भाग पाडलं. इतकेच नव्हे, तर गर्भापाताच्या वेळी तरुणीला रक्तस्त्राव झाला आणि त्यावेळी मोहितने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. हेच फोटो दाखवून आरोपीने पुन्हा पीडतेला ब्लॅकमेल करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू लागला.
हे ही वाचा: सांगली हादरलं, संपूर्ण कुटुंब घरात पडलेलं निपचित, सासू-सुनेचा मृत्यू तर पिता-पुत्राची अवस्था गंभीर.. नेमकं काय घडलं?
पोलिसांकडून आरोपीला अटक
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून मोहितला अटक करण्यात आली आहे. तसेच, गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू असून पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असल्याचं उलवे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेने नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.