Gangrape Shocking News : झारखंडच्या गुमला जिल्ह्यातून एका अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर एका जंगलात तिघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत जंगलात सोडून दिलं. पीडितेवर अत्याचार केल्यानंतर ते सर्व आरोपी फरार झाले.
ADVERTISEMENT
रिपोर्टनुसार, नराधमांनी अत्याचार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी कशीबशी घरी पोहोचली आणि घडलेल्या प्रकाराबाबत तिने कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीनं गुमला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेची मेडिकल टेस्ट केली आणि पोक्से कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुमलाचे एसपी यांनी दिलेल्या आदेशानंतर एसडीपीओ सुरेश प्रसाद यादव यांच्या नेतृत्वात एक टीम गठित करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा दणका दाखवत तिन्ही आरोपी अनुप उरांव, पंकज उरांव आणि बलराम महतो यांना अटक केली.
हे ही वाचा >> मुंबईकरांसाठी खुशखबर! चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल ट्रेन धावणार; 'असं' आहे वेळापत्रक
ग्रामीण भागात संतापाची लाट पसरली अन्...
आरोपींनी घटनास्थळी वापरलेली स्कूटी पोलिसांनी जप्त केली आहे. या लाजिरवाण्या घटनेनंतर ग्रामीण लोकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी त्यांनी केलीय. जेणेकरून भविष्यात कोणीही अशाप्रकारचं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. दरम्यान, गुमला जिल्ह्यात ही पहिलीच घटना नाहीय. या घटनेआधी काही दिवसांपूर्वी सुरसांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतही सामूहिक बलात्काराची घटना घडली होती.
एका विवाहसोहळ्यात अल्पवयीन मुलगी शौचसाठी बाहेर गेली असता, तिच्यावर सात जणांनी अत्याचार केला होता. याप्रकरणातीह पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सहा आरोपींना अटक केली होती. सुरेंद्र नगेसिया, विमल कुमार, संजू राम (सर्व गुमलाचे सुरसांग येथील रहिवासी) आणि अर्पण रोशन सोरेंग, दिनेश तिर्की उर्फ नितिन, अमरदीप कुल्लू (सिमडेगा) यांना अटक केली होती.
हे ही वाचा >> बाईईई...हा काय प्रकार! आज पुन्हा सोन्याच्या दरात झाली प्रचंड वाढ..किंमत वाचून तुमचंही टेन्शन वाढेल
ADVERTISEMENT
