मुंबईकरांसाठी खुशखबर! चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल ट्रेन धावणार; 'असं' आहे वेळापत्रक

मुंबई तक

गणेशोत्सवाच्या निमित्ताने 250 विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या गणपती स्पेशल ट्रेन्सचं रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण 24 जुलैपासून सुरू होणार आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, काही मुख्य गाड्यांच्या वेळापत्रकाबद्दल जाणून घ्या.

ADVERTISEMENT

चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल ट्रेन धावणार; 'असं' आहे वेळापत्रक
चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल ट्रेन धावणार; 'असं' आहे वेळापत्रक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी विशेष ट्रेन्सची घोषणा

point

चाकरमान्यांसाठी धावणार स्पेशल ट्रेन

point

काय आहे वेळापत्रक?

Mumbai News: मुंबई आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या कोकणी नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवाच्या निमित्ताने 250 विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या गणपती स्पेशल ट्रेन्सचं रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण 24 जुलैपासून सुरू होणार आहे. यासोबतच आता पश्चिम रेल्वेने 44 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. मुंबई आणि विरार दरम्यान राहणाऱ्या कोकणी लोकांना मध्य रेल्वेच्या या सुविधेचा फायदा होणार आहे. या गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होईल.

प्रवासी रेल्वेची अधिकृत वेबसाइट किंवा NTES मोबाईल अॅपवरून या गाड्यांची अधिक माहिती मिळवू शकतात. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, काही मुख्य गाड्या खालीलप्रमाणे आहेत.

ट्रेन क्रमांक 01151/2 सीएसएमटी (CSMT)- सावंतवाडी रोड- सीएसएमटी (दररोज): 

ही ट्रेन 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. ही गाडी सीएसएमटीहून दुपारी 12.20 वाजता सुटेल आणि सावंतवाडीला दुपारी 2.20 वाजता पोहोचेल. तसेच, या ट्रेनच्या 40 फेऱ्या असतील. 

ट्रेन क्रमांक  01103/4 सीएसएमटी (CSMT) - सावंतवाडी रोड-  सीएसएमटी (दररोज): 

ही ट्रेन 22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान चालेल. ही सीएसएमटीहून दुपारी 3.30 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. या ट्रेनच्या 36 फेऱ्या असतील. 

हे वाचलं का?

    follow whatsapp