बाईईई...हा काय प्रकार! आज पुन्हा सोन्याच्या दरात झाली प्रचंड वाढ..किंमत वाचून तुमचंही टेन्शन वाढेल
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात या आठवड्यात किरकोळ वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात या आठवड्यात किरकोळ वाढ झाल्याचं समोर आलं आहे. सोन्याच्या दरवाढीमुळे 24 कॅरेट सोन्याचे भावा लाखाच्या पार गेले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर एका आठवड्यात 330 रुपयांनी महागले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या भावात 300 रुपयांची वाढ झाली आहे.
जगभरात सोनं ऑल टाईम हाय रेकॉर्डवर आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100190 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91850 रुपये झाले आहेत. चांदीच्या किंमतीतही 1000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे भाव 116000 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91700 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91700 रुपये झाले आहेत.