राज्यातील 'या' भागात मान्सूनची स्थिती स्थिर, पुणे आणि साताऱ्यात पावसाची परिस्थिती काय?

Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या (IMD) नुसार राज्यात मान्सून सक्रिय राहणार असल्याचा हवमान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील आजचे हवामान, 1 May 2025 (फोटो सौजन्य: Grok)

महाराष्ट्रातील आजचे हवामान, 1 May 2025 (फोटो सौजन्य: Grok)

मुंबई तक

• 07:00 AM • 21 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला

point

जाणून घ्या मान्सूनस्थिती

Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या (IMD) नुसार राज्यात मान्सून सक्रिय राहणार असल्याचा हवमान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील मान्सूनच्या परिस्थितीबाबत जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हेही वाचा : महापालिका निवडणूक, ठाकरे बंधु एकत्र, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव...उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात सगळंच सांगितलं

कोकण : 

कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अंशता ढगाळ वातावरण निर्माण होईल. तर रायगडमध्ये सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील मान्सूनची अपडेट समोर आली आहे. पुणे आणि साताऱ्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून दाखल होणार आहे. विशेषत: दुपारनंतर किंवा सायंकाळी कोल्हापूरृ, सांगलीत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे.

मराठवाडा : 

मराठवाड्यात पावसाचा जोर कमी अनुभवायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा किंवा तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. जालना येथे ढगाळ वातावरण निर्माण होईल, परंतु मान्सूनची तीव्रता कमी असणार आहे. 

विदर्भ : 

विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा येथे बहुतांश ठिकाणी हलका मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नागपूर आणि अमरावतीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार मान्सूनची स्थिती असेल. 

हेही वाचा : पुण्यात भोंदू ज्योतिषाने सोडली लाज, तरुणीला एकांतात बोलावले अन् थेट घट्ट मिठीच मारली

21 जुलै रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 24 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.


 

    follow whatsapp