Shocking Love Story Viral Chat : दिल्लीत एका पत्नीनं दिरासोबत अफेअर करून पतीच्या हत्येचा कट रचला. 35 वर्षांचा करण देव त्याची पत्नी सुष्मिता देव आणि 6 वर्षांच्या मुलासोबत उत्तम नगरच्या ओम-विहार फेज-1 मध्ये राहत होते. याचदरम्यान, सुष्मिताची ओळख तिचा चुलत दीर राहुलसोबत झाली. दोघांमध्येही संबंध झाले, पण करणमुळे ते ऐकमेकांसोबत राहू शकत नव्हते.
ADVERTISEMENT
यामुळे दोघांनी करणच्या हत्येची प्लॅनिंग केली. सुष्मिताने पतीच्या हत्येच्या दिवशी दीर राहुलसोबत मिळून पूर्ण प्लॅनिंग केली. दोघांनी रात्रभर इन्स्टाग्रामवर हा प्लॅन केला की, करणची हत्या कशी करावी आणि घरच्यांना काय सांगायचं? सुष्मिता आणि राहुलमध्ये नेमकं काय चॅटिंग झाली, जाणून घेऊयात.
पतीच्या हत्येचा कट रचला..अन् ते चॅट झालं व्हायरल
- सुष्मिता (वहिनी) - कधीपर्यंत वाट पाहायची?
- राहुल (दीर) : तू बोलशील तेव्हापर्यंत..
- सुष्मिता - 4 वाजता करून बघू..तोपर्यंत मी झोपते.
- राहुल - 4 वाजेपर्यंत जास्त उशिर होणार नाही का?
- सुष्मिता - तू बोल मग.
- राहुल - थोडं आधी.
- सुष्मिता - तू सांग..कधीपर्यंत येणार आहेस?
- राहुल - 3 वाजेपर्यंत येईल. घराच्या गल्लीत आहे. येऊ का?
- सुष्मिता - कुठे आहेस आता?
- राहुल - घर
- सुष्मिता - काही समजत नाही, काय करू?
- राहुल - तू सांग..तो झोपला आहे, आता काय करतोय?
- सुष्मिता - इच्छेसाठी बोलत आहे.
- राहुल - हा.
- सुष्मिता - मी विचार करत होती की, औषधाने काम होणार नाही. म्हणून इतक्या वेळ थांबली.
- राहुल - आणखी औषध दे..ट्राय कर होत असेल तर..
- सुष्मिता - 2 किंवा 2.5 इतकेच उरलेत. त्याने दही खाल्लं नाही. गोळ्या खाल्ल्यावर किती वेळात मृत्यू होतो? अजून त्याचा मृत्यू झाला नाही.
- राहुल - कधीपर्यंत मरणार? काही समजत नाही.
- सुष्मिता - अच्छा, करंटसाठी कसं बांधायचं आहे? हळू श्वास घेतो. मुंगी चावल्याने हलला होता.
- राहुल - जेवढं औषध उरलंय, तेवढं द्या.
- सुष्मिता - तोंड उघडता येत नाही. पाणी टाकू शकते. पण औषध टाकता येत नाही.
- राहुल - मग वीजेचा शॉकच देऊयात. वेळ पण निघून जातोय.
- सुष्मिता - तू ये, आपण दोघे मिळून औषध देऊ.
- राहुल - चल मी येतो.
- सुष्मिता - हाच मेसेज कर.
- राहुल - गेटवर आहे.
हे ही वाचा >> सांगली हादरलं, संपूर्ण कुटुंब घरात पडलेलं निपचित, सासू-सुनेचा मृत्यू तर पिता-पुत्राची अवस्था गंभीर.. नेमकं काय घडलं?
ही होती दीर राहुल आणि पत्नी सुष्मिताचं चॅट. दोघांनी मिळून पूर्ण हत्येचा कट रचला होता. सुष्मिताने पतीला आधी 20-25 झोपेच्या गोळ्या दिल्या. नंतर मुंगीच्या चाव्याने चेक केलं. त्यानंतर दीराला बोलावलं आणि पतीला वीजेचा शॉक दिला. त्यानंतर करणचा मृत्यू झाला. पोलीस तपासात उघडकीस आलं की, सुष्मिता आणि राहुलचं अफेअर दोन वर्षांपूर्वीच सुरु होतं. करणला या नात्याबाबत कळलंच नाही. सुष्मिता आणि राहुलने करणला मारण्याचा प्लॅन बनवला. हत्येनंतर करणने कुटुंबियांना खोटं सांगितलं की, करणला वीजेचा शॉक लागला आहे. या हत्येच्या कटात राहुलचे वडीलही सामील होते.
ADVERTISEMENT
