Govt Job: 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये फ्रेशर्स उमेदवारांसाठी तब्बल 600 पदांसाठी भरती! कधीपासून कराल अर्ज?

'बँक ऑफ महाराष्ट्र'कडून तब्बल 600 अप्रेन्टिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विशेषत: फ्रेशर्स उमेदवारांसाठी असणार आहे.

'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये मोठी भरती...

'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये मोठी भरती...

मुंबई तक

• 12:35 PM • 14 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये फ्रेशर्स उमेदवारांसाठी भरती!

point

कधीपासून कराल अर्ज?

Bank of Maharashtra Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी बँकेत काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ही भरती विशेषत: फ्रेशर्स उमेदवारांसाठी असणार आहे. 'बँक ऑफ महाराष्ट्र'कडून तब्बल 600 अप्रेन्टिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून 15 जानेवारी 2026 पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच, 25 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

अप्रेन्टिसशिपच्या काळात उमेदवारांना बँकेत काम करण्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं. खास करून फ्रेशर्स तरुणांसाठी ही अप्रेन्टिस अतिशय फायदेशीर असते.  

काय आहे पात्रता? 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, स्थानिक भाषेचं ज्ञान असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. यासाठी, उमेदवारांचं 10 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमात संबंधित भाषेचा समावेश असणं अनिवार्य आहे. 

हे ही वाचा: पुण्यात खळबळ! डिनर पार्टीत जमले मित्र, पण अचानक प्रेमसंबंधातून वाद अन् नायजेरिअन नागरिकाची निर्घृण हत्या...

वयोमर्यादा 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे वयोमर्यादा उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. 

हे ही वाचा: 5 वर्षीय चिमुकलीसोबत नको ते कृत्य; शेजाऱ्याने फूस लावून निर्जनस्थळी नेलं अन्... मारहाणीत पीडितेच्या आईचा गर्भपात

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम bankofmaharashtra.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर, आधी रजिस्ट्रेशन करून मिळालेल्या लॉगिन क्रेडेंशिअलच्या आधारे वेबसाइटवर लॉगिन करा. 
3. आता, अर्जात सर्व आवश्यक माहिती स्टेप बाय स्टेप भरा. 
4. नंतर, डॉक्यूमेंट सेक्शनमध्ये फोटो आणि सही स्कॅन करून योग्य साइझमध्ये अपलोड करा. 
5. अर्ज भरल्यानंतर, प्रवर्गानुसार शुल्क भरा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा. 

या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर झालं असून याचं विस्तृत नोटिफिकेशन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल. 

    follow whatsapp