पुण्यात खळबळ! डिनर पार्टीत जमले मित्र, पण अचानक प्रेमसंबंधातून वाद अन् नायजेरिअन नागरिकाची निर्घृण हत्या...
पुण्यातील पसोळी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये 40 वर्षीय नायजेरिअन नागरिकाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इमेका क्रिश्चिअन अशी मृताची ओळख समोर आली असून प्रेमसंबंधातून झालेल्या वादामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डिनर पार्टीत जमले मित्र, पण अचानक प्रेमसंबंधातून वाद अन्...
नायजेरिअन नागरिकाची निर्घृण हत्या...
पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: पुण्यातील पसोळी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील अपार्टमेंटमध्ये एका 40 वर्षीय नायजेरिअन नागरिकाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इमेका क्रिश्चिअन अशी मृताची ओळख समोर आली असून प्रेमसंबंधातून झालेल्या वादामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला. या हत्येप्रकरणात, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
प्रेमसंबंधातून वाद अन् हाणामारी
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित घटना रविवारी रात्री घडली असून घटनेच्या दिवशी, पीडित तरुण इतर नायजेरिअन मित्रांसोबत डिनरसाठी पिसोळी धर्मावत पेट्रोल पंपजवळ असलेल्या एका महिलेच्या घरी गेले होते. दरम्यान, संबंधित महिलेवरून त्यांच्यात वाद सुरू झाले. खरं तर, आरोपींपैकी एका तरुणाचे महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि त्याचं नेहमी प्रेयसीच्या घरी येणं-जाणं असायचं. पीडित इमेकाने त्यांच्या नात्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि तेव्हा त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
हे ही वाचा: 5 वर्षीय चिमुकलीसोबत नको ते कृत्य; शेजाऱ्याने फूस लावून निर्जनस्थळी नेलं अन्... मारहाणीत पीडितेच्या आईचा गर्भपात
बेदम मारहाण करत तरुणाची निर्घृण हत्या
वरिष्ठ पोलीस अधिकारी मान सिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री हा वाद आणखी चिघळला आणि सोमवारी जवळपास 3 वाजताच्या सुमारास या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. यामध्ये इमेका क्रिश्चिअनला बेदम मारहाण करण्यात आली आणि या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झाला. आरडओरडा ऐकून आसपासचे लोक सुद्धा घाबरले. त्यानंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
हे ही वाचा: पुणे : अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर छापा; नेमकं काय सापडलं?
या घटनेनंतर, काळेपडळ पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 103 (हत्या) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जॉनपोल ओबिन्ना मोनेके (40) आणि न्यानेमेको मदुबुची ओनिया (43) या दोन तरुणांना अटक केली असून घटनेतील तिसरा आरोपी अद्याप फरार असल्याचं सांगितलं जात आहे.










