Govt Job: 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन्... कधीपर्यंत कराल अप्लाय?

मुंबई तक

• 02:16 PM • 11 Dec 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) कडून बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवाइजर (BC Supervisor)पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये मिळवा नोकरी...

'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये मिळवा नोकरी...

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

point

मोठ्या पदांसाठी निघाली भरती अन्...

point

भरतीसाठी कधीपर्यंत कराल अप्लाय?

Central Bank of India Recruitment: सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)कडून     बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवाइजर (BC Supervisor)पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार centralbank.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझरची भरती

'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'च्या कृषी, ग्रामीण विकास आणि वित्तीय समावेशन विभाग, तसेच केंद्रीय कार्यालयासाठी बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझरची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये निवृत्त आणि तरुण उमेदवार सुद्ध सहभागी होऊ शकतात. 

पात्रता आणि वयोमर्यादा 

सेंट्रल बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांना कंप्यूटरचं देखील ज्ञान असणं गरजेचं आहे. यामध्ये एम.एससी (आईटी)/ बी.ई (आईटी)/ एमसीए/ एमबीए क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. या भरतीमध्ये 21 ते 45 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

हे ही वाचा: लव्ह ट्रँगलमधून प्रियकराची निर्घृण हत्या! चाकू आणि सर्जिकल ब्लेडने वार अन्... नेमकं प्रकरण काय?

किती मिळेल पगार? 

सुपरवायझर टाइप निश्चित पगार व्हेरिएबल (परिवर्तनशील) कंपोनंट वाहतूक भत्ता मोबाईल/इंटरनेट शुल्क
कॅटेगरी अ (A) 15,000 रुपये 10,000 रुपये  4,000 रुपये  500 रुपये 
कॅटेगरी ब (B) 12,000 रुपये 8,000 रुपये 3,000 रुपये

500 रुपये 

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाचं फॉर्मेट डाउनलोड करा.
2. हे नोटिफिकेशन लिंकवरून देखील डाउनलोड करता येऊ शकते. 
3. त्यानंतर, फॉर्मची प्रिंटआउट काढा आणि त्यात सर्व आवश्यक माहिती भरा. 
4. यासोबतच, ओळखपत्रासह मागितलेले सर्व शैक्षणिक तसेच वैयक्तिक डॉक्यूमेंट्स फॉर्मला अटॅच करा आणि बँकेच्या पत्त्यावर पाठवा. 
5. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटला भेट देऊन अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.