Govt Job: सेन्ट्रल रेल्वेत मिळवा नोकरी... 2418 पदांवर मोठी भरती, कुठे आणि कसं कराल अप्लाय?

सेन्ट्रल रेल्वेकडून अप्रेन्टिसशिपच्या एकूण 2418 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 12 ऑगस्ट 2025 रोजी या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

सेन्ट्रल रेल्वेत मिळवा नोकरी... 2418 पदांवर मोठी भरती

सेन्ट्रल रेल्वेत मिळवा नोकरी... 2418 पदांवर मोठी भरती

मुंबई तक

• 01:34 PM • 15 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सेन्ट्रल रेल्वेकडून 2418 पदांसाठी भरती

point

कुठे आणि कसं कराल अप्लाय?

Govt Job: रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सेन्ट्रल रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सेन्ट्रल रेल्वेकडून अप्रेन्टिसशिपच्या एकूण 2418 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 12 ऑगस्ट 2025 रोजी या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार www.rrccr.com या रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) असणं आवश्यक आहे. 

काय आहे वयोमर्यादा? 

सेन्ट्रल रेल्वेच्या अप्रेन्टिसशिप पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 15 वर्षे तर कमाल वय 24 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या एससी (SC)/ एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 5 वर्षे सूट देण्यात येईल. तसेच, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचणार! कोस्टल रोड आणि एससीएलआर एक्सटेंशनचं उद्घाटन...

अर्ज करण्यासाठी शुल्क

अप्रेन्टिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क सवलतीची तरतूद आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

हे ही वाचा: LIVE Independence day PM Modi Speech: ‘दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या झाडल्या’, लाल किल्ल्यावरून PM मोदींचं घणाघाती भाषण

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.rrccr.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. होमपेजवरील Online Applications या लिंकवर क्लिक करा. 
3. त्यानंतर, रजिस्ट्रेशन करुन लॉगिन करा आणि मागितलेली वैयक्तिक माहिती भरा. 
4. माहिती भरुन झाल्यानंतर आवश्यक डॉक्यूमेंट्सच्या स्कॅन केलेल्या कॉपी अपलोड करा. 
5. त्यानंतर, प्रवर्गानुसार उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्जाचं शुल्क भरा. 
6. आता भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्या आणि त्यानंतर तो सबमिट करा. अर्जाची प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा.

 

    follow whatsapp