Govt Job: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS कडून मोठी भरती; 17 लाखांचं पॅकेज अन्...

इंस्टीट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) कडून डेप्युटी मॅनेजर (एआई अॅप्लिकेशन डेव्हलपर) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

IBPS कडून मोठी भरती

IBPS कडून मोठी भरती

मुंबई तक

• 01:34 PM • 27 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!

point

IBPS कडून मोठी भरती; 17 लाखांचं पॅकेज अन्...

Govt Job: सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंस्टीट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) कडून डेप्युटी मॅनेजर (एआई अॅप्लिकेशन डेव्हलपर) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार www.ibps.in या IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

IBPS अंतर्गत केली जाणारी डेप्युटी मॅनेजर पदाची ही भरती रेग्युलर बेसवर केली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा, स्किल टेस्ट, ग्रुप एक्साइझ आणि पर्सनल इंटरव्ह्यू या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची मुंबई शहरात पोस्टिंग केली जाणार असल्याची माहिती आहे. अशातच, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावं लागेल. 

पात्रता आणि वयोमर्यादा   

IBPS च्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून (कंप्यूटर सायन्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग)/ एमसीए/ एमएससी कंप्यूटर सायन्स अशा क्षेत्रांत डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, या भरतीसाठी कंप्यूटर सायन्स/ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग मध्ये एम.टेक किंवा त्याहून अधिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, पायथॉन, जनरेटिव्ह एआय, एलएलएम, एआय मॉडेल क्रिएशन, मशीन लर्निंग इत्यादी क्षेत्रांत एआय डेव्हलपमेंटचा 3 वर्षांचा अनुभव असणं अनिवार्य आहे. 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 23 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे अशी उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच, उमेदवारांना पायथॉन, SQI आणि डेटाबेस स्कीमा डिझाइन MySQL, SQL सर्व्हर, PostgreSQL यांचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या उमेदवारांना सुमारे 17.15 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळेल. 

हे ही वाचा: 'मी नक्कीच दादांबरोबर...' अजित पवारांसाठी मनसे मैदानात उतरणार? राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भेटीत काय घडलं?

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम www.ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर, Recruitment सेक्शनमध्ये जाऊन  Click Here to Apply Online लिंकवर क्लिक करा. 
3. आता इसके लिए आपको Click Here for New Registration जाऊन रजिस्ट्रेशन करा. 
4. नंतर, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या साहाय्याने वेबसाइटवर लॉगिन करा. 
5. लॉगिन केल्यानंतर सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा आणि अर्ज भरल्यानंतर, आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा. 
6. शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा. 

या भरतीच्या लेखी परीक्षेत बुद्धिमत्ता, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, इंग्रजी आणि व्यावसायिक ज्ञान या विषयांवरून प्रत्येकी 40 प्रश्न असतील. असे परीक्षेत उमेदवारांना 250 गुणांसाठी एकूण 200 प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असून चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण कापले जातील. 

    follow whatsapp