Govt Job: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या मोठ्या सरकारी बँकेने तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. या बँकेकडून समर इंटर्नशिप 2025 साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया 15 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून उमेदवार 15 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. RBI मध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
ADVERTISEMENT
किती मिळेल स्टायपेंड?
या इंटर्नशिपसाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये स्टायपेंड देण्यात येईल. या इंटर्नशिपचा कालावधी तीन महिन्यांचा असून तो एप्रिल ते जुलै 2026 पर्यंत असेल. या काळात, फ्रेशर्स तरुणांना RBI तज्ञ, अधिकारी आणि टेक्निकल टीमसोबत काम करण्याची संधी मिळेल, यातून कोणत्याही विद्यार्थ्याच्या पुढील करिअरसाठी चांगला अनुभव मिळेल.
काय आहे पात्रता?
- पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी
- 5-वर्षीय इंटीग्रेटेड कोर्सचे विद्यार्थी
- 3-वर्षीय LLB कोर्सचे विद्यार्थी
मॅनेजमेंट, कॉमर्स, इकोनॉमिक्स, इकोनोमेट्रिक्स, स्टॅटिस्टिक्स, बँकिंग किंवा फायनान्स सारख्या विषयांत शिक्षण घेतलेले उमेदवार या इंटर्नशिपच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. फ्रेशर्स उमेदवारांना आर्थिक सिस्टिमचा अनुभव प्राप्त करण्याची संधी मिळेल आणि त्यासोबतच भविष्यात बँकिंग किंवा आर्थिक क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता सुद्धा वाढते.
हे ही वाचा: मुंबई: सोलापूर–कल्याणदरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 5 कोटींचे सोने लंपास! प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह...
यावेळी, आरबीआयने एकूण 125 इंटर्न पदांची घोषणा केली आहे. निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होईल: शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
कसा कराल अर्ज?
1. अर्ज करण्यासाठी उमेदवार RBI च्या opportunities.rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
2. आता, Current Vacancies आणि नंतर, Summer Placement सेक्शनवर क्लिक करा.
3. त्यानंतर, Online Web-Based Application Form ओपन करा.
4. यामध्ये तुमची आवश्यक माहिती भरा.
5. शेवटी फोटो, सही आणि संस्थेकडून मिळालेलं बोनाफाइड सर्टिफिकेट अपलोड करा.
6. अर्ज सबमिट करा आणि डाउनलोड करून सेव्ह करा.
ADVERTISEMENT











