Govt Job: क्रीडा क्षेत्रात करिअरची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कडून असिस्टंट कोच पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत स्विमिंग, सायकलिंग, जूडो, शूटिंग, खो-खो अशा एकूण 26 खेळांमधील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झालं आहे.
ADVERTISEMENT
या भरतीसाठी 1 फेब्रुवारी 2026 पासून उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतील. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार sportsauthorityofindia.nic.in या 'स्पोर्ट्स ऑथरिटी ऑफ इंडिया'च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करू शकतात. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता
क्रीडा प्राधिकरणाच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे SAI NS-NIS, पटियाला किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोचिंगमध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य डिग्री असणं आवश्यक आहे. किंवा ऑलिंपिक/ पॅरालिंपिक/ आशियाई खेळ/ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील अनुभवासह सर्टिफिकेट कोचिंग कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.
हे ही वाचा: अकोला: इंस्टाग्रामवर LIVE व्हिडीओ बनवत बाटलीतून विष प्राशन केलं अन्... 18 वर्षीय तरुणाने असं का केलं?
वयोमर्यादा
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी 30 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: फलटण हत्याकांड: पत्नीने पती आणि प्रियकरासोबत मिळून रचला कट अन् दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे नदी-तलावात...
कशी होणार निवड
असिस्टंट कोच पदावर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा आयोजित केली जाईल. ज्यामध्ये क्रीडा ज्ञानावर आधारित, क्रीडा सायन्सवर आधारित तसेच सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अॅप्टिट्यूड या विषयांशी निगडीत एकूण 100 गुणांचे प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेव्यतिरिक्त, अंतिम गुणवत्ता यादीत कोचिंग क्षमता चाचणीला 60 टक्के महत्त्व असेल.
अर्जाचं शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल (Open), ईडब्ल्यूएस (EWS) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 2500 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. एससी (SC)/ एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना आणि एक्स सर्व्हिसमन तसेच महिलांना 2000 रुपये शुल्क भरावं लागेल.
ADVERTISEMENT











