Govt Job: SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती, पगाराचा आकडा वाचून थक्कच व्हाल... काय आहे पात्रता?

मुंबई तक

• 02:10 PM • 22 Jan 2026

भारतीय स्टेट बँक (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, स्टेट बँकेकडून व्हाइस प्रेसिडेंट (स्टेट बँक उपाध्यक्ष), डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट (उप-उपाध्यक्ष), असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (सहाय्यक उपाध्यक्ष) अशा मोठ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती

SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती

Google CTA

बातम्या हायलाइट

point

SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती

point

पगाराचा आकडा वाचून थक्कच व्हाल...

point

काय आहे पात्रता आणि वयोमर्यादा?

Govt Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, स्टेट बँकेकडून व्हाइस प्रेसिडेंट (स्टेट बँक उपाध्यक्ष), डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट (उप-उपाध्यक्ष), असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (सहाय्यक उपाध्यक्ष) अशा मोठ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. 

हे वाचलं का?

विशेषत: बँकेत नोकरीचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील. 

काय आहे पात्रता? 

भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये व्हाइस प्रेसिडेंट पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांकडे ऑफ डिझाइन/ बी.टेक/ बी.ई ची डिग्री किंवा कंप्यूटर सायन्स/ कंप्यूटर सायन्स अँड इंजीनिअरिंग/ सॉफ्टवेयर इंजीनिअरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स अशा संबंधित क्षेत्रात किमान 50 टक्के गुणांसह डिग्री किंवा MCA/ M.Tech/ M.sc ची डिग्री असणं आवश्यक आहे. यासोबतच, ह्युमन फॅक्टर्स इंटरनॅशनल, गूगल  UX/इंटरेक्शन डिझाइन फाउंडेशन अशा विषयात UX सर्टिफिकेट असणं देखील गरजेचं आहे. 

याव्यतिरिक्त, उमेदवारांना ई-कॉमर्स/ बँकिंग इंडस्ट्री/ फिनटेक कंपनी/ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी किंवा कंज्यूमर फेसिंग कंपनीत 15 वर्षांचा अनुभव असणं अनिवार्य आहे. तसेच, डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट पदासाठी देखील याच शैक्षणिक पात्रतेसह 12 वर्षांचा अनुभव विचारात घेतला जाईल. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट पदासाठी संबंधित डिग्रीसह 8 वर्षांचा अनुभव, यासोबतच सीनिअर स्पेशल एक्झिक्युटिव्ह पदासाठी 5 वर्षांचा अनुभव आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी 4 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रतेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात. 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पदानुसार उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. किमान 25 वर्षे आणि कमाल 50 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. 31 डिसेंबर 2025 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. 

किती मिळेल पगार? 

  • कंत्राटी पदांवर 40 लाख ते 80 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज दिलं जातं, तर डेप्युटी मॅनेजरचा पगार 64,820 रुपये ते 93,960 रुपये इतका असेल. 
  • कॉन्ट्रॅक्टचा कालावधी: 5 वर्षे 

अर्जाचं शुल्क 

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून या पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य (Open), ईडब्ल्यूएस (EWS), ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तसेच, इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. 

हे ही वाचा: BMC Mayor: पाहा मुंबई महापालिकेत कोण होणार महापौर?, 'या' प्रवर्गासाठी निघालं आरक्षण

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 
2. त्यानंतर, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करा. 
3. आता, अर्जात वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा. 
4. नंतर, डॉक्यूमेंट अपलोडच्या सेक्शनमध्ये जाऊन पासवर्ड साइज फोटो, सही आणि इतर स्कॅन केलेले डॉक्यूमेंट्स अपलोड करा. 
5. शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म फायनल सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा.