Supreme Court Law Clerk Recruitment 2026: सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टाकडून नुकतीच लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट्स पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. SCI कडून www.sci.gov.in या वेबसाइटवर भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. 20 जानेवारी 2026 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इंस्टिट्यूटमधून लॉ ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. यासाठी 'बॅचलर ऑफ लॉ'ची डिग्री असणं असणं आवश्यक आहे. यासोबतच, 'बार काउन्सिल ऑफ इंडिया'मध्ये अॅडव्होकेट (वकील) म्हणून रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. तसेच, लॉ कोर्सच्या पाचव्या किंवा ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करण्यासाठी पात्र असतील. परंतु लॉ क्लर्क पदावर नियुक्त होण्यापूर्वी त्यांना लॉ क्वालिफिकेशनची पात्रता प्राप्त करणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं अनिवार्य आहे.
हे ही वाचा: सिंधुदुर्ग: आई भाजी विकत असताना मुलगा CRPF मध्ये निवड झाल्याची बातमी घेऊन आला, ह्रदयस्पर्शी व्हिडीओ
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 32 वर्षे अशी उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 7 फेब्रुवारी 2026 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल.
रिक्त जागा: 90 (अंदाजे)
पगार: दरमहा 1,00,000 रुपये
कसा कराल अर्ज?
1. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.sci.gov.in या सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. आता, Notices सेक्शनमध्ये जाऊन Judicial Clerkship टॅबवर क्लिक करा.
3. त्यानंतर, टायटलमध्ये Online Application for Registration for Engagement of Law Clerk-cum-Research Associates on short-term contractual basis – 2026-2027 समोर एक पीडीएफ दिसेल.
4. त्यामध्ये अर्ज करण्यासाठी लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून To Register वर जा.
5. आता, आवश्यक माहिती भरून जनरेट ओटीपी क्रिएट करा.
6. मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करा.
7. नंतर, अर्जात योग्य माहिती भरून फॉर्म चेक करा आणि अर्जाचं शुल्क भरून तो सबमिट करा.
ADVERTISEMENT











