Dawood Ibrahim: दाऊदला खरंच विष दिलं होतं का, काय आहे सत्य?

प्रशांत गोमाणे

• 03:38 AM • 19 Dec 2023

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषबाधा आणि रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्तावर आता गुप्तचरांनी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वसनीय गुप्तचर सूत्रांनी 17 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवा फेटाळून लावल्या आहेत

pakistan underworld don dawood ibrahim poison and hospital rumour denies intelligence sources

pakistan underworld don dawood ibrahim poison and hospital rumour denies intelligence sources

follow google news

Dawood Ibrahim : भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विषबाधा झाल्याच्या बातम्या काल सोमवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याला पाकिस्तानातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगितले जात होते. मात्र आता दाऊदवर विषप्रयोग आणि त्याचा मृत्यू झाला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दाऊद संबंधित बातम्या खोट्या असून ही निव्वळ एक अफवा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पसरवल्या कुणी? आणि यामागे नेमका हेतू काय होता? हे जाणून घेऊयात. (pakistan underworld don dawood ibrahim poison and hospital rumour denies intelligence sources)

हे वाचलं का?

खरं तर पाकिस्तानच्या एका युट्यूबरने दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग आणि त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. पाकिस्तानी यूट्यूबरच्या या व्हिडिओनंतर ही बातमी वाऱ्यासारखी भारतात आणि पाकिस्तानात पसरली होती. यूट्यूबरने सोशल मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवून दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याचा अंदाज लावला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा : Gunaratna Sadavarte : “जरांगे, डंके की चोट पे सांगतोय, त्यांची सुटका…”

युट्यूबरने या अफवांचा थेट संबंध पाकिस्तानमध्ये अचानक इंटरनेट बंद करण्याशीही जोडला होता. मात्र, अधिकृत सूत्रांनी हे दावे फेटाळून लावले. आणि यासाठी विरोधी पक्ष पाकिस्तान- तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या आभासी बैठकीत कनेक्टिव्हिटी ब्रेकला जबाबदार धरले.

विशेष म्हणजे, जागतिक इंटरनेट स्वातंत्र्यावर नजर ठेवणाऱ्या इंटरनेट नेटब्लॉक्सने रविवारी संध्याकाळी सुमारे सात तास पाकिस्तानमधील प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महत्त्वपूर्ण निर्बंध दर्शवणारे मेट्रिक्स जारी केले. या घटनेबाबत नेटब्लॉक्स म्हणाले, “ही घटना विरोधी पक्षनेते इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयला लक्ष्य करणाऱ्या इंटरनेट सेन्सॉरशिपच्या मागील उदाहरणांचे अनुसरण करते.”

दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषबाधा आणि रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्तावर आता गुप्तचरांनी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वसनीय गुप्तचर सूत्रांनी 17 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

हे ही वाचा : WhatsApp वर ‘ते’ फोटो, लग्नाच्या दिवशीच नववधूने घेतला गळफास अन्…

‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये काय?

दरम्यान आता दाऊद आणि त्याच्या एका साथीदाराची एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) समोर आली आहे. ही ऑडिओ क्लिप इंडिया टुडे/आज तककडे उपलब्ध आहे, ज्यामध्ये दाऊद इब्राहिम आणि त्याचा सरदार फारुख यांचे शब्द ऐकू येतात. या ऑडिओमध्ये दाऊद त्याच्या साथीदाराला जेद्दाहहून लुई व्हिटॉन (Louis Vuitton) चे शूज आणण्यास सांगत आहे. यावेळी दाऊद त्याच्या चपलांचा नंबर सांगतो, माझ्या चपलांचा आकार 42 आणि क्रमांक 9 आहे. यानंतर तो ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या लुई व्हिटॉन शूजच्या आकारातील फरक स्पष्ट करतो.

    follow whatsapp