Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यात उष्णता वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

• 05:11 PM • 17 Feb 2026

maharashtra weather : राज्यात काही विभागातील वातावरणात बदल घडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही भागांत हवामान हे कोरडं राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत वातावरण उष्ण आणि कोरडं राहिल अशी शक्यता उपस्थित केली, जाणून घेऊयात 17 फेब्रुवारी रोजी हवामान विभागातील अंदाज. 

maharashtra weather

maharashtra weather

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही विभागातील वातावरणात बदल घडण्याची शक्यता

point

राज्यातील काही भागांत वातावरण उष्ण आणि कोरडं राहिल

Maharashtra Weather : राज्यात काही विभागातील वातावरणात बदल घडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही भागांत हवामान हे कोरडं राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत वातावरण उष्ण आणि कोरडं राहिल अशी शक्यता उपस्थित केली, जाणून घेऊयात 17 फेब्रुवारी रोजी हवामान विभागातील अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार? तारीखही ठरली, फक्त औपचारिकता बाकी

कोकण :  

कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबई-ठाण्यात तापमान स्थिर राहील. आकाश निरभ्र राहील, तसेच नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हापासून सावध राहावे असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र :  

पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ ते अंशत: पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. घटमाथ्यावर आर्द्रता अधिक जाणवून उकाडा निर्माण होईल, तर मैदानी भागात कोरड्या हवामानाचा अंदाज राहील. तसेच उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे आणि उष्ण राहील. 

मराठवाडा :  

मराठवाडा विभागातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि हिंगोलीसह मराठवाडा विभागात हवामान उष्ण आणि कोरडं राहील असा हवामानाचा अंदाज आहे. काही ठिकाणी धुके जाणवू शकतात. 

हे ही वाचा : ठाण्यात 16 वर्षीय मुलीनं इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन, नोटमध्ये लिहिलं 'कुटुंबावर ओझं..'

विदर्भ : 

विदर्भात उन्हाचा तडाखा अधिक जाणवेल. नागपूरसह विदर्भात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. दुपारी उष्णतेची लाट पसरण्याची स्थिती निर्माण होईल.