पालघर: रबर कंपनीची भिंत कोसळून तिघांचा दुर्देवी मृत्यू

मुंबई तक

• 05:02 PM • 24 Sep 2026

Palghar News : पालघर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाडा ठाणे क्षेत्रातील विक्रमगढ रोड येथे टीना रबर कंपनी स्टोअर रुमची भिंत अचानकपणे कोसळली. या दुर्घटनेत तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Palghar news

Palghar news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पालघर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार

point

रबर कंपनी स्टोअर रुमची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

Palghar News : पालघर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाडा ठाणे क्षेत्रातील विक्रमगढ रोड येथे टीना रबर कंपनी स्टोअर रुमची भिंत अचानकपणे कोसळली. या दुर्घटनेत तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 24 सप्टेंबर रोजी गुरुवारी घडल्याचे वृत्त समोर आले आहे.  मृत मजुरांची केशव वालकू गुनगुणा ( 55 वय),  मीरा जानू गवळी (60 वय) आणि रंजना दिलीप कोंब (35 वय)  अशी ओळख समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ज्ञानेश कुमार यांनी मोदींच्या घरात चपरासी म्हणून राहावं - अभिजीत दीपके

कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली तिघांचा अडकून मृत्यू 

कंपनीतील काही मजुर हे नाश्ता करत होते. यादरम्यान, त्या ठिकणी स्टोअर रूमची भिंत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत भीतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून तिघांचा मृत्यू झाला. इतक्यात वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेनं पालघर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

पोलिसांनी तपास केल्यानंतर सांगितलं की, सकाळी 10 वाजता टीन रबर कंपनीत मजुर नाश्ता करत होते. त्यादरम्यान एका स्टोअर रुममधील भिंत अचानकपणे कोसळली. या दुर्घटनेत तीन कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

हे ही वाचा : आई-वडिलांनी मुलीला नाचण्यास केला विरोध, प्रकृती बिघडून 16 वर्षीय मुलीचा मृत्यू

मजुरांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर 

या भीषण दुर्घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मजूरांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न उपस्थित होत आहे. भिंत पडलीच कशी? भिंत जीर्ण झाली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.