Panvel News : पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन मृतदेहाची आदलाबदली झाल्याचं सांगण्यात येत आहे. एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावरच अंत्यसंस्कार केल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून मृतदेहांची आदलाबदल झाली आणि या प्रकरणामुळे दोन कुटुंबात वाद निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालना: सात ते आठ जणांकडून तरुणावर लोखंडी रॉडसह लाठी काठीने हल्ला, 'त्या' कारणावरून तरुणाला रात्रीच संपवलं
नेमकं काय घडलं?
जेव्हा हे संबंधित प्रकरण समोर आलं तेव्हा सुशांत मल्लमचे कुटुंबीय रुग्णालयात मृतदेह घेण्यासाठी गेले होते. तेव्हा तो मृतदेह त्यांच्या मुलाचा नसल्याने स्पष्ट झाले. तपासानंतर समजले की, सुशांतचा मृतदेह बिष्णा रावत यांच्या नातेवाईकांनी नेला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
संबंधित प्रकरणात आरोग्य अधिकारी अशोक गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथील रहिवासी सुशांत मल्ला एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याने 20 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता खारघर पोलिसांनी अपघाताची नोंद केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच दिवशी बिष्षा रावत नावाच्या एका सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. यानंतर या दोघांचेही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात पाठवले असता, दोघेही नेपाळचे असल्याचे सांगण्यात येत आहे, अशी यापूर्वी कधीही घटना घडली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मृतदेहाची आदलाबदली
दोघांच्या कुटुंबियांना रुग्णालयात बोलावले आणि रावत परिवाराला व्हिडिओ मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह दाखवण्यात आले, त्यानंतर कुटुंबियांनी कसलीही तक्रार न करता संबंधित मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सुशांतचा परिवार हा मुळचा नेपाळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे. तपास केल्यानंतर मृतदेहाची आदलाबदली झाल्याचे समोर आले.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यातील 'या' तारखेपासून मंगळाचा महागोचर योग, 'या' राशींचे कसे असेल नशीब?
दरम्यान, सुशांत मल्लचे नातेवाईक हे नेपाळला असल्याने ते रुग्णालयात आले. त्यांनी मृतदेह ओळखण्यास नकार दिला. दोन्ही कुटुंबे नेपाळमधील असल्याने या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने रुग्णालय प्रशासनाकड़ून ही चूक झाली. रुग्णालयात जाऊन संबंधित प्रशासनाने यावर तोडगा काढत, दोन्ही कुटुंब येऊन शिल्लक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत होकार दिला.
ADVERTISEMENT











