परभणी : तिहेरी हत्याकांडातील आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या, आई-मावशीसह आणखी एकाचा केला होता खून

Parbhani Crime : परभणी तालुक्यातील असोला गावात 2022 साली घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. या प्रकरणात राजू अडकिने या व्यक्तीने कौटुंबिक वादातून अत्यंत क्रूरपणे आपल्या आईसह मावशी आणि मावशीच्या नवऱ्याचा खून केल्याचा आरोप आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

02 Jan 2026 (अपडेटेड: 02 Jan 2026, 12:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

परभणी : आधी आई, मावशी अन् तिच्या नवऱ्याची हत्या केली

point

अन् आता आरोपीची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

परभणी : परभणी जिल्हा कारागृहात तिहेरी खून प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोठडीत असलेला हा आरोपी खटल्याची सुनावणी सुरू असतानाच मृतावस्थेत आढळून आल्याने कारागृहातील सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे वाचलं का?

परभणी : तिहेरी हत्याकांडातील आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

परभणी तालुक्यातील असोला गावात 2022 साली घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. या प्रकरणात राजू अडकिने या व्यक्तीने कौटुंबिक वादातून अत्यंत क्रूरपणे आपल्या आईसह मावशी आणि मावशीच्या नवऱ्याचा खून केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर ताडकळस पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आणि तो तेव्हापासून परभणी जिल्हा कारागृहात कोठडीत होता.

सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू असून सुनावणीच्या प्रक्रियेत असतानाच, काल रात्री आरोपीने कारागृहातील आपल्या कोठडीत गळफास घेतल्याचे समोर आले आहे. कारागृह कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने त्याला खाली उतरवून उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कारागृहात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा : सांगली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी NS लॉ कॉलेज समोर रक्ताचा सडा, किरकोळ वादातून तरुणाचा निर्घुण खून

घटनेनंतर मयत आरोपीचा मृतदेह परभणी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. येथे नानलपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून, सहाय्यक पोलीस अधीक्षक बेनीवाल यांनीही रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येत असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, परभणी जिल्हा कारागृहात यापूर्वीही कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कारागृह प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि कैद्यांच्या मानसिक आरोग्याबाबत घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोठडीत असताना आरोपीकडे गळफास घेण्यासारखे साधन कसे उपलब्ध झाले, याबाबतही चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचाऱ्यांची ड्युटी नोंद आणि इतर बाबी तपासल्या जाणार आहेत. तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा असा अंत झाल्याने पीडित कुटुंबीयांसह नागरिकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या घटनेनंतर प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नांदेड: विनयभंगाच्या आरोपाखाली तुरुंगात गेला, मनात सुडाची भावना अन् जामीनावर सुटल्यानंतर पीडितेच्या पतीलाच जाळलं...

    follow whatsapp