एका रात्रीसाठी 6000..'त्या' गेस्ट हाऊसमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट, क्लिप व्हायरल! पोलिसांनी धाड टाकताच 3 महिलांना..

Today Shocking Viral News : आसामच्या गुवाहाटीच्या एका गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस अल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका रात्रीचे 6000 देऊन याठिकाणी देहव्यापार सुरु होता.

नागपूरमधील आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उद्ध्वस्त (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

नागपूरमधील आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उद्ध्वस्त (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

• 04:32 PM • 07 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये काय घडायचं?

point

एका रात्रीसाठी ग्राहकांकडून 6000 रुपये घ्यायचे अन्..

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Today Shocking Viral News : आसामच्या गुवाहाटीच्या एका गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस अल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका रात्रीचे 6000 देऊन याठिकाणी देहव्यापार सुरु होता. पोलिसांनी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आलीय आणि तीन महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना या अवैध धंद्यात अडकवण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

पूर्व गुवाहाटीचे डीसीपी मृणाल डेका यांनी म्हटलं की, डिसपूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीत म्हटलं होतं की, जोया नगरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खबर मिळाली होती.  पोलिसांनी तातडीनं तपास सुरु करून चार लोकांना अटक केली. बप्ती हाजरिका, जोनाली चौखम, रितुमोनी गौहेन राभा आणि रिया दास अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. बप्ती हाजरिका या गेस्ट हाऊसचा मालिक आहे. हा बेकायदेशीर व्यवसाय मागील आठ महिन्यांपासून सुरु असल्याचं डेका यांनी म्हटलं आहे.

हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये काय घडायचं?

पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की, हे रॅकेट गेस्ट हाऊस आणि शहरातील काही हॉटेलमध्ये सुरु होतं. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत असाही खुलासा करण्यात आला आहे की, या व्यवसायात सहभागी असलेले लोक ग्राहकांना या गेस्ट हाऊस किंवा हॉटेलमध्ये बोलवत होते. पोलिसांनी गेस्ट हाऊसचं रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेजही त्यांच्या ताब्यात घेतलं आहे. जेणेकरून याप्रकरणाचा कसून तपास करता येईल. एका व्यवहारासंबंधी एक महिला आणि पुरुषाची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हे ही वाचा >> राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी

एका रात्रीसाठी ग्राहकांकडून 6000 रुपये घ्यायचे अन्..

पोलिसांनी सुटका केलेल्या तीन महिलांचं वय 20-28 वर्षांच्या दरम्यान आहे. या सर्व महिला गुवाहाटीच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. महिलांना या कामासाठी महिन्याला 18000 रुपये दिले जायचे. तर ग्राहकाकडून एका रात्रीचे 6000 रुपये घेतले जायचे. डीसीपी मृणाला डेकाने म्हटलं की, हे प्रकरण खूप संवेदनशील आहे आणि पुढील तपास सुरु आहे. त्यांनी म्हटलं, आम्ही गेस्ट हाऊसचं रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासलं आहे. यामध्ये आम्हाला माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. आणखी काही लोक या रॅकेटशी जोडले गेले असतील, तर लवकरच पोलीस त्यांना अटक करतील.

हे ही वाचा >> "भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली, महाराष्ट्रात तर..", महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

    follow whatsapp