Viral Video: साडी नेसून प्रोफेसरचा डान्स, झापुक झुपुक कल्ला अन् धिंगाणा...

Professor Dance in Saree: सध्या कॉलेजमधील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिला प्रोफेसर या स्टेजवर साडीमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

साडी नेसून प्रोफेसरचा डान्स, झापुक झुपुक कल्ला अन् धिंगाणा...

साडी नेसून प्रोफेसरचा डान्स, झापुक झुपुक कल्ला अन् धिंगाणा...

मुंबई तक

• 05:39 PM • 30 Aug 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

कॉलेजमधील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

point

महिला प्रोफेसरचा स्टेजवर साडीमध्ये तुफान डान्स

point

नेमका कुठला आहे हा व्हिडिओ?

Teacher Dance Viral Video: मुबंई: सध्या सोशल मीडियावर एका कॉलेजमधील कार्यक्रमाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये स्टेजवर कॉलेजच्या काही महिला प्रोफेसर या चक्क 'काला चष्मा...' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या सर्व महिला प्रोफेसरनी साडी नेसलेली आहे. ज्यांच्यामध्ये अरुणिमा देवाशीष ही शिक्षिका अप्रतिम स्टेप्स करत दिसून येत आहे. तिच्या स्टेप्स बघून प्रेक्षकांनी त्यांच्या डान्सला तुफान प्रतिसाद दिला. खरं तर अरुणिमा हिच्या या झापुक झुपुक स्टेप्स पाहून स्टेजवरील सर्वांनीच ताल धरला.  (professor did such a dance in saree video of her dance on stage went viral)

हे वाचलं का?

नेमका कोणता आहे हा Video?

मिळालेल्या माहितीनुसार महिला प्रोफेसरचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ केरळमधील एर्नाकुलम येथील सेंट तेरेसा कॉलेजचा आहे.

हा व्हिडिओ इतक्या एवढ्या कमी वेळात व्हायरल झाला आहे की, तो एक कोटींहून अधिक जणांनी पाहिला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण अरुणिमाचे तोंड भरून कौतुक करत आहेत. 

दरम्यान, मंचावर उपस्थित कॉलेजमधील मुलींनीही आपल्या शिक्षिकेच्या या डान्सला खूपच चियर केलं. एका विद्यार्थ्याने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'आमच्या शिक्षिका खूपच कूल आहेत.'

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतरांसोबत गायक आणि रॅपर बादशाह यानेही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केली. त्यांनी यावेळी लिहिलं की- 'प्रेझेंट मॅडम.' प्रोफेसर अरुणिमा देवाशीष ही देखील एक प्रोफेशनल डान्सर आहे. जिचे  इंस्टाग्रामवर 6,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

शिक्षकांचे मुलांसोबत मस्ती करतानाचे असे अनेक व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. काही काळापूर्वी एका शाळेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका शिक्षिकेने तिच्या वाढदिवसानिमित्त वर्गातील मुलांसोबत जोरदार डान्स केला होता. यामध्ये 'कजरारे...' या गाण्यावर मॅडमचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता.

    follow whatsapp