पुणे : बाळाच्या सततच्या रडण्याला वैतागली, आईने 11 महिन्यांच्या बाळाला मारुन टाकले विहिरीत

मुंबई तक

• 12:00 PM • 08 Apr 2026

पुण्यातील एका आईने आपल्या 11 वर्षांच्या बाळाचा जीव घेतला आहे. आपल्या पोटच्या गोळ्याला संपवण्यामागं तिनं सांगितलेलं कारण अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीत तिने काय सांगितलं, जाणून घ्या.

Pune Crime

Pune Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बाळाच्या सततच्या रडण्याला वैतागली

point

आईने 11 महिन्यांच्या बाळाला मारुन टाकले विहिरीत

Pune Crime : पुण्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आपल्या पोटच्या 11 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याप्रकरणी एका 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 8 मार्च रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. तर पोलिसांनी जवळपास एक महिन्यानंतर म्हणजे 7 एप्रिल रोजी अटक केली आहे.

हे वाचलं का?

'घरात पडून मृत्यू'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात बाळाला घेऊन पत्नी घरातून निघून गेल्याची तक्रार आरोपी महिलेच्या पतीने पोलिसांत दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना 5 एप्रिल रोजी या महिलेचा ठावठिकाणा लागला. सुरुवातीच्या चौकशीत घरात पडून बाळाचा मृत्यू झाल्याचे आरोपी महिलेने सांगितले. भीतीपोटी तिने बाळाचा मृतदेह शेतातील विहिरीत टाकल्याचे सांगितले. रोपी महिलेने दिलेल्या साक्षीनुसार सुरुवातील आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र पोलिसांना तिच्या बोलण्यात विरोधाभास जाणवला. यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

हे ही वाचा : पाऊस पडतोय म्हणून थांबली अन् घडलं भयानक, मजुरांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

अखेर दिली कबुली

आरोपी महिलेने सांगितले की, ती आपल्या मुलाच्या सततच्या रडण्यामुळे वैतागली होती. तसेच आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती. दुसऱ्या लग्नात बाळामुळे अडथळा निर्माण होत होता. यामुळे मानसिक दुविधेत असलेल्या महिलेने बाळाचा शेवट करायचे ठरवले.

हे ही वाचा : DRDO Recruitment 2026 : फ्रेशर्ससाठी डीआरडीओमध्ये संधी, अप्रेंटिससाठी सुरु झालीये भरती; लगेच अर्ज करा

विहिरीतून बाहेर काढला मृतदेह

तपासा दरम्यान पोलिसांनी विहिरीतून बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. यानंतर त्या 11 महिन्यांच्या निरागस जीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास सुरु आहे. यामुळे प्रकरणातील सर्व सत्य बाहेर येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.