रायगड हादरलं, सख्खा भावांनी मिळून केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून, धक्कादायक कारण समोर

Raigad Crime : रायगड हादरलं, सख्खा भावांनी मिळून केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून, धक्कादायक कारण समोर

Raigad Crime

Raigad Crime

मुंबई तक

04 Nov 2025 (अपडेटेड: 04 Nov 2025, 09:43 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सख्खा भावांनी मिळून केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून

point

रायगड धक्कादायक घटना, हत्येचं कारण समोर

म्हसळा, जि. रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मेंदडीकोंड गावातील दोन सख्ख्या भावांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. म्हसळा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी नरेश महादेव कांबळे (वय 63, मजूर) आणि चंद्रकांत महादेव कांबळे (वय 60, निवृत्त कर्मचारी) या दोघांना अवघ्या 12 तासांत अटक केली. मृतांची नावे महादेव कांबळे (वय 95) आणि विठाबाई कांबळे (वय 83) अशी असून, दोघांचे मृतदेह घरातच आढळले. मुलगी अर्चना भालचंद्र पाटील (वय 40, रा. शिस्ते, ता. श्रीवर्धन) हिने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

हे वाचलं का?

या घटनेने म्हसळा परिसरासह संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक की आत्महत्येमुळे? याबद्दल संभ्रम होता. परंतु म्हसळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने तपास सुरू केल्यानंतर प्रकरण खुनाचे असल्याचे स्पष्ट झाले. संशयाच्या आधारावर तपास पुढे नेल्यानंतर फक्त 24 तासांत पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.

हेही वाचा : 'मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल पण...', शिंदेंच्या मराठी आमदारने उडवली खळबळ

चौकशीत नरेश आणि चंद्रकांत कांबळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आई-वडील घरखर्चासाठी पैसे देत नाहीत तसेच घरात राहू देत नाहीत, या कारणावरून दोन्ही मुलांना पालकांविषयी तीव्र नाराजी होती. या रागाच्या भरात त्यांनी आपलेच आई-वडील संपवण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून त्यांनी दोघांचा गळा घोटून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातच ठेवून आरोपी पळून गेले.

दोन दिवसांनंतर शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता वृद्ध दांपत्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले. तपासात उघडकीस आलेल्या या सत्याने गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे. या घटनेमुळे म्हसळा तालुका आणि परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पोटच्या लेकरांनीच जन्मदात्यांचा जीव घेतल्याच्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. म्हसळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Personal Finance: SIP चा नवा रेकॉर्ड! सोने आणि इक्विटी फंडने चमकवला बाजार, तुम्हीही करू शकता गुंतवणूक

    follow whatsapp