रायगड हादरलं! पोटच्या लेकरांनीच 'त्या' एका कारणासाठी आईवडिलांची केली हत्या, मृतदेह दोन दिवस कुजलेल्या अवस्थेत खोलीत

Raigad Crime : दोन मुलांनी आपल्याच आई वडिलांची हत्या केली आहे, हत्येचं कारण ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एका गावतील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Raigad Crime

Raigad Crime

मुंबई तक

• 05:34 PM • 03 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन्ही भावांनी आपल्याच जन्मदात्यांचा घेतला जीव

point

धक्कादायक कारण आलं समोर

point

घटनेनं रायगड हादरलं

Raigad Crime : आई-वडील घरात राहू देत नाहीत, पैसे देण्यासही नकार देत असल्याने दोन्ही भावांनी आपल्याच जन्मदात्यांचा जीव घेतला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता, दोन्ही तरुणांनी हत्येचा कबुलीनामा दिला आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. महादेव कांबळे (वय 70) आणि विठाबाई कांबळे (वय 65) अशी मृत आई वडिलांनची नावे आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 10 वर्षाची चिमुकली विहिरीवर धुवत होती कपडे, दोघांनी तिला इमारतीत उचलून नेलं , नंतर तोंडात बोळा कोंबून आळीपाळीने...

मृत्यूमागचे कारण काय? 

गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा मृतदेह हा घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. या घटनेनंतर हा मृत्यू नैसर्गिक होता की आत्महत्या, असा संशय व्यक्त केला गेला. या घटनेदरम्यान, म्हसळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हे शाखेच्या मदतीने केलेल्या एकूण तपासात या मृत्यूमागचे कारण शोधून काढले. या मृत्यूमागे संबंधित प्रकरणात खूनाचा सुगावा लागलेला आहे. पोलिसांनी शोध सुरु केल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

आईवडिलांची मृत्यूचं धक्कादायक कारण 

आरोपींची नावे देखील आता समोर आली आहेत. नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे यांना पोलिसांनी बेड्या ठोकत ताब्यात घेतलं आहे. संबंधित प्रकरणात गुन्ह्याचा कबुलीनामा देखील देण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईवडील घरखर्चासाठी पैसे देत नाहीत, तसेच घरात राहूनही देत नसल्याचा राग मनात ठेऊन त्यांनी आपल्या आई वडिलांना संपवलं. 

मृत्यूचा असा केला खुलासा 

दोघांनी घटनेच्या रात्री घरात प्रवेश केला आणि आई वडिलांवर हल्ला चढवत दोघांचीही हत्या केली. त्यानंतर मृतदेह हा घरातच ठेवला आणि त्यांनी पळ काढला. दोन दिवस मृतदेह घरात तसाच कुजलेल्या अवस्थेत असल्याने सर्वत्र दुर्गंध पसरल्याने शेजारच्यांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा खुलासा झाला. 

हे ही वाचा : 'राज ठाकरेंच्या छातीवर बसेन', परप्रांतीय सेक्युरीटी गार्डची मुजोरी, मनसैनिकांनी चोप देताच नरमला, व्हिडिओ व्हायरल

या घटनेनं परिसर हादरून गेला आहे आणि संतापाची लाट उसळली आहे. पोटच्या पोरींनीच आईवडिलाचा खून केल्याच्या घटनेमुळे नागरिक स्तब्ध झाले आहेत. गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. 

    follow whatsapp