कमला पसंद अन् राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सूनेची आत्महत्या, ओढणीने घेतला गळफास

Rajshree And Kamla Pasand Owner's Daughter-In-Law Dies By Suicide : कमला पसंद अन् राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सूनेची आत्महत्या, ओढणीने घेतला गळफास

Rajshree And Kamla Pasand Owner's Daughter-In-Law Dies By Suicide Rajshree And Kamla Pasand Owner's Daughter-In-Law Dies By Suicide

Rajshree And Kamla Pasand Owner's Daughter-In-Law Dies By Suicide

मुंबई तक

26 Nov 2025 (अपडेटेड: 26 Nov 2025, 01:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कमला पसंद अन् राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सूनेची आत्महत्या

point

ओढणीने घेतला गळफास

Rajshree And Kamla Pasand Owner's Daughter-In-Law Dies By Suicide : दिल्लीतील वसंत विहार परिसरात प्रसिद्ध कमला पसंद आणि राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या कुटुंबात घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या उद्योगसमूहाचे मालक कमल किशोर यांची सुना दीप्ती चौरसिया (वय 40) यांनी मंगळवार सायंकाळी आत्महत्या केली. त्यांच्या निवासस्थानी ओढणीला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपासाला सुरुवात केली.

हे वाचलं का?

तपासादरम्यान पोलिसांना घरातील खोलीतून एक सुसाईड नोट सापडली आहे. मात्र, त्या चिठ्ठीत नेमके कोणाचा उल्लेख आहे किंवा काय लिहिले आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. फक्त चिठ्ठी महत्त्वपूर्ण असून तिच्या आधारे तपासाचा ठसा पुढे नेला जाईल, एवढेच संकेत त्यांनी दिले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दीप्ती आणि त्यांचे पती हरप्रीत चौरसिया यांच्यात काही दिवसांपासून वाद होत होते. कुटुंबातील वाद, मतभेद आणि वैयक्तिक ताणतणावामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दीप्तींच्या कुटुंबीयांकडून हरप्रीत आणि त्यांच्या कुटुंबावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचेही समजते.

दीप्ती आणि हरप्रीत यांचे लग्न 2010 मध्ये झाले होते. त्यांच्या मागे 14 वर्षांचा मुलगा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये प्रेम, विश्वास आणि नात्यातील दुराव्यावर संकेत देणारे काही मुद्दे नमूद केले आहेत. "नात्यात प्रेम आणि विश्वास नसल्यास त्या नात्यात राहण्याला काहीच अर्थ उरत नाही," असा आशय त्या चिठ्ठीत असल्याची माहिती समोर येत आहे.

हरप्रीत यांनी दोन विवाह केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यांची दुसरी पत्नी दक्षिण भारतातील असल्याचे आणि ती अभिनेत्री असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दीप्ती यांनी अत्यंत मानसिक तणावात हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आत्महत्येमागील खरे कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू आहे.

गुटखा व्यवसायातून उभारले कोट्यवधींचे साम्राज्य

कमला पसंद आणि राजश्री पान मसाला तयार करणाऱ्या चौरसिया कुटुंबाची ओळख उद्योगजगतामध्ये भक्कम आहे. मूळचे कानपूरचे असलेल्या या कुटुंबाचा व्यवसाय जवळपास 40-45 वर्षांपूर्वी छोट्या प्रमाणावर सुरू झाला.

कानपूरमधील फीलखाना परिसरात कमला कांत चौरसिया यांनी पान मसाला आणि गुटखा तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला छोट्या प्रमाणावर पान मसाला विकणारे चौरसिया यांनी 1980-85 च्या दरम्यान घरातूनच पान मसाला तयार करण्यास सुरुवात केली. कालांतराने हा व्यवसाय एका विशाल उद्योगसमूहात रूपांतरित झाला आणि आज त्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या उद्योगसम्राटाच्या कुटुंबातील सुनेने आत्महत्या केल्यामुळे व्यवसायिक जगतासह संपूर्ण दिल्लीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आत्महत्येच्या या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू असून, पुढील चौकशीत अनेक नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काय होणार? सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय घडलं?

 

    follow whatsapp