Sangli News : सांगलीत भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विटा शहरातील एका इमारतीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेनं विटा शहर हादरून गेलं आहे. चौघांपैकी आई-वडील मुलगी आणि नात अशा चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे हृद्ययद्रावक वृत्त आहे. मृतांची नावे समोर आली आहेत. विष्णु जोशी (वय 47), सुनंदा विष्णु जोशीं (वय 42), प्रियांका योगेश इंगळे (वय 25), सृष्टी इंगळे (वय 2) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सुप्रिया सुळेंची राजकीय प्रगल्भताच काढली, अंबादास दानवेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
इमारतीत आग्नीतांडव, कुटुंबातील चार व्यक्तींचा अंत
संबंधित प्रकरणात सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील विटा येथे एका तीन मजली असलेल्या इमारतीत आग्नीतांडव निर्माण झाले. काळजाचं पाणी करणाऱ्या या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या आगीत दोघेजण गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे, तर दोन वर्षांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा अंत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तीन मजली इमारतीतल्या तळमजल्यावर स्टील फर्निचरच्या दुकानाला ही भीषण आग लागली. या आगीत इमारत जळून खाक झाली आहे.आमदार सुहास बाबर आणि ऍड. वैभव पाटील यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यासाठी यंत्रणा लावली. यावेळी आसपासच्या भागातून 6 ते 7 अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला.
हे ही वाचा : 'तुमच्या वडिलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी..' शेतकऱ्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या विखेंना राजू शेट्टींनी सुनावलं
फ्रिजमधील सिलेंडरच्या स्फोटामुळे आग
तर दुसरीकडे या इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू झाले. यावेळी अग्निशमन विभागाच्या गाडीतील शिडीच्या साहाय्याने इमारतीची खिडकी आणि भिंत फोडून लोकांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमसह, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका चालकांसह नागरिकांनी बचाव कार्यासाठी मोठी ताकद लावली. ही आग फ्रिजमधील सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











