'तुमच्या वडिलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी..' शेतकऱ्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या विखेंना राजू शेट्टींनी सुनावलं

मुंबई तक

Radhakrushnha Vikhe Patil : भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत गरळ ओकली होती. त्यानंतर विखे पाटलांवर प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडूंनी जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यानंतर आता राजू शेट्टी यांनी विखे पाटलांना चांगलंच सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

raju shetty
raju shetty
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी? 

point

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? 

Radhakrushnha Vikhe Patil : भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत गरळ ओकली होती. त्यानंतर विखे पाटलांवर प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडूंनी जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यानंतर आता राजू शेट्टी यांनी विखे पाटलांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राधा कृ्ष्ण पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. 

हे ही वाचा : नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, दृश्य पाहून अंगावर काटा

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी? 

आहो विखे पाटील,1980 साली शरद जोशींनी ऊसाला प्रतिटन 300 रूपये दर मिळावा म्हणून तुमच्या कारखान्यावर यशस्वी आंदोलन केले होते तेंव्हा तुमच्या वडीलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॅालेजची 4 हजार 500 रूपये फी होती. 

त्याच वडिलांचे इंजिनिअरिंग कॅालेज तुम्ही आज चालवताय त्यामध्ये इंजिनीअंरिगच्या विद्यार्थ्याला 4.50 लाख रूपये  फी घेताय व त्याच वडीलांच्या साखर कारखाना तुम्ही चालविताय त्यामध्ये आज ऊसाला प्रतिटन 3 हजार दर देताय इंजिनिअरिंग कॅालेजच्या फीप्रमाणे ऊस दर वाढविला असता तर आज उसाला 30 हजार मिळाला असता मग आमचच कर्ज काय तुमच्या कारखान्यावर असलेल कर्ज सुध्दा आम्हीच फेडल असतं, असा आशय सोशल मीडियावर शेअर करत राजू शेट्टींनी टीकेचे बाण सोडले आहेत. 

हे ही वाचा : जालन्यात 24 वर्षीय तरुणाचे 38 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध, दोघांनीही गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल, तपासातून भलतच...

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? 

काही दिवसांपासून सत्ताधारी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीवर प्रश्न विचारत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारानंतर, आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्ज मागायचं, हा प्रकरण अनेक वर्षांपासून सुरु आहे. सोसायट्या काढायच्या, कर्ज घ्यायचंत. मग कर्जमाफी करून घ्यायची आणि पुन्हा कर्जासाठी अर्ज करायचा हेच सुरु आहे,' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp