जालन्यात 24 वर्षीय तरुणाचे 38 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध, दोघांनीही गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल, तपासातून भलतच...
Jalna Crime : जालना जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील वालसंगी गावातील एक प्रेमी युगलने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालना जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना
दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध
Jalna Crime : जालना जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील वालसंगी गावातील एक प्रेमी युगलने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव गणेश वाघ (वय 28) आणि जयाबाई पांडुरंग गवळी (वय 40) असे नाव आहे. दोघेही वालसावंगी या गावातील रहिवासी आहेत.
हे ही वाचा : रायगड हादरलं! शिक्षक आणि विद्यार्थ्याचा काशीद बीचवरील पाण्यात बुडून मृत्यू, घटनेनं परिसर हादरला
दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश वाघ आणि जयाबाई गवळी यांच्यात मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. गावात आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये या नातेसंबंधामुळे एक मोठी चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात आलं. सांगण्यात येत आहे की, या प्रेमसंबंधामुळे दोघांच्याही कुटुंबात केवळ वादंग निर्माण झाला होता.
दोघांनीही उचललं टोकाचं पाऊल
या कौटुंबिक कलहामुळे दोघांनीही टोकाचं पाऊल उचललं आहे. घडलेल्या घटनेनुसार, पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान, दोघेही मोटारसायकलवरून अजिंठा येथील कालिंका देवी मंदिराजवळील जंगलात पोहोचले. काही वेळानंतर त्यांच्यात चर्चा झाली. तेव्हा दोघांनीही झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
मृतदेह झाडाला लटकलेले
सकाळी काही ग्रामस्थ घटनास्थळी गेले असता, त्या ठिकाणी दोघांचेही मृतदेह झाडाला लटकलेले आढळून आले होते. हे बघून ग्रामस्थांनी पारध पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी दोघांच्या मृत्यूबाबत पुष्टी केली.










